पोलीस असल्याची बतावणी करून पैसे मागणाऱ्या सहा जणांना अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
पोलीस असल्याची बतावणी करून वाहनाने  जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहन चालकांना पैसे मागणाऱ्या सहा जणांना कारवाफा पोलीसांनी अटक केली आहे. या सर्व जणांना  न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने आरोपींना २५ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
रमेश आनंदराव मडावी(४४), विक्की सुरेश  मडावी(२६), सौरव रमेश मडावी(१९), संजय यादव वडणलवार (४७), राहुल कान्होजी मेश्राम(२१) विक्रांत ऋषी
मडावी(२३) सर्व रा. कारवाफा अशी आरोपींची नावे आहे.  फिर्यादी व त्यांचे साथीदार जनावरे घेऊन दिंडवीवरुन गडचिरोलीकडे जात होते. साखेराच्या अलिकडे आरोपींनी  वाहन अडवुन त्यांना आपण पोलीस असल्याची बतावणी केली. आरोपींनी जबरदस्तीने वाहनचालकाकडून मोबाईल, रक्कम व पॉकेट काढुन बेदम मारहाण केली. तसेच एक लाख रुपयांची मागणी केली. याबाबतची तक्रार कारवाफा  पोलीस स्टेशनमध्ये दाखल केल्यानंतर पोलीसांनी सहा जणांना अटक केली. या सर्वांना न्यायालयाने २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस  कोठडी सुनावली आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनात धानोराचे प्रभारी अधिकारी अजिनाथ कोठाडे करीत आहेत.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-22


Related Photos