महत्वाच्या बातम्या

 चामोर्शी येथे तालुकास्तरीय विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनी उत्साहात संपन्न


- शाळा हे विज्ञान प्रयोग संशोधनाचे केंद्र असावे : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आ. डॉ. देवराव होळी यांचे प्रतिपादन 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : बालपणापासुन वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासत अधंश्रद्धेला थारा देऊ नये व विज्ञान हा दैनंदिन जीवन जगण्याचा भाग असल्याने विविध समस्यांची सोडवणुक करण्यासाठी शाळा हे विज्ञान प्रयोग संशोधनाचे केंद्र असावे, असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार डाॅ. देवराव होळी यांनी काॅरमेल एकाडमी चामोर्शी येथे आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान व शैक्षणिक साहीत्य प्रदर्शनीच्या व्यासपिठावरुन उदघाटन प्रसंगी बोलत केले.

कार्यक्रमाची सुरुवात अल्बर्ट आईनस्टाईन आणि ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आले. विज्ञान व शैक्षणिक साहीत्य प्रदर्शनाच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागावा तसेच यशस्वी मानवी जीवन जगण्यासाठी विज्ञानाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणातुन कारमेल एकेडमीचे प्राचार्य फादर आसस्टीन आलेनचेरी यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारमेल एकेडमी मोर्शी चामोर्शीचे प्राचार्य फादर आइंस्टीन एलेनचेरी होते. प्रमुख अतिथी म्हणुन माजी प.स. सदस्या धर्मशीला प्रमोद सहारे, भाजपा बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, भाजपा चामोर्शी तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, तालूका महामंत्री साईनाथ बुरांडे, चामोर्शी पं.स. चे गटशिक्षणाधिकारी नरेंद्र म्हस्के, शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एस. ताराम, यशोधरा विद्यालयाचे प्राचार्य श्याम रामटेके, जा.कृ. बोमनवार हाॅयस्कुलचे प्राचार्य इतेंद्र चांदेकर, कृषक हाॅयस्कुलचे मुख्याध्यापक अरविंद भांडेकर, नेताजी सुभाषचंद्र बोस हाॅयस्कुलच्या मुख्याध्यापिका एस.एस. गयाली, जेष्ठ भाग शिक्षणाधिकारी राम सातपुते, केंद्रप्रमुख हिम्मतराव आभारे, केंद्रप्रमुख गोटपर्तीवार, महाराष्टृ अंधश्रद्धा निर्मुलन समीतीचे शिवराम मोगरकर, प्रशांत नैताम उपस्थित होते.

यासह कार्यक्रमास्थळी तालुकास्तरीय विज्ञान व शैक्षणिक साहीत्य प्रदर्शनीत सहभागी सर्व शाळेचे विज्ञान शिक्षक सर्वश्री रघुनाथ भांडेकर, राजु धोडरे, विलास माळवे, दिलीप देवतळे, महादेव डे, बिजन मंडल, अशीम बिश्वास, गौरकर, कोटगीरवार, जितेंद्र मुसद्दीवार, कोचे,रामटेके, दासरवार, बंडु राठोड, सुभाष राॅय, येल्लेवार, सुनिल धाञक, सहारे, उके, तसेच कार्यक्रम व्यवस्थापक म्हणुन कारमेल एकेडमीचे अमरदिप चौधरी, प्रफुल शेंडे, गटसाधन केंद्र चामोर्शीचे डोंगरे, शेट्टे, पिपरे यासह सहभागी सर्व शाळेचे शिक्षक, शिक्षिका वृंद, कारमेल एकाडमीचे सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद आदी उपस्थित होते.
याप्रसंगी मंचावरील प्रमुख अतिथी प्राचार्य शाम रामटेके, शिवराम मोगरकर यांनीही आपल्या मार्गदर्शनातुन मानवी जीवनात विज्ञानाचे फार मोठे महत्वाचे स्थान, असे प्रतिपादन केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समीतीचे प्रशांत नैताम यांनी अंधश्रद्धा निर्मुलनावर आधारित काही प्रयोग उपस्थित विद्यार्थ्यांसमोर करुन दाखविले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधीकारी नरेंद्र म्हस्के, संचालन प्रफुल शेंडे तर आभार सुरेखा सांगोळकर यांनी मानले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos