महत्वाच्या बातम्या

 भाजप महिलांनी संघटित होवुन पक्ष संघटन मजबुत करावे : भाजपा जिल्हा महामंत्री योगीता पिपरे


- आमगाव -देवरी विधानसभा क्षेत्र येथील तालुका देवरी व आमगाव येथे लोकसभा समन्वय बैठक संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आगामी लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणूकांसाठी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संघटित होवून पक्ष संघटन मजबुत करावे व भाजपचा विजय खेचुन आनुया, असे प्रतिपादन भाजपा जिल्हा महामंत्री तथा महिला आघाडी लोकसभा संयोजिका योगीता पिपरे यांनी केले.

भारतीय जनता पार्टी महिला आघाडी गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राची लोकसभा समन्वय बैठक आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातील तालुका देवरी, आमगाव येथे भाजपा जनसंपर्क कार्यालयात, भाजपा जिल्हा महामंत्री तथा लोकसभा संयोजिका योगीता पिपरे यांच्या नेतृत्वात, जी.प. बालकल्याण सभापती गोंदिया तथा बेटी बचाओ, बेटी पढाओ पुर्व विदर्भ संयोजिका सविता पुराम, जेष्ठ नेत्या प्रतिभा चौधरी, शहर अध्यक्ष कविता उरकुडे, देवरी तालुका अध्यक्ष देवकि मरई, आमगाव तालुका अध्यक्ष अंजु बिसेन, पुष्पां करकाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लोकसभा समन्वय बैठक संपन्न झाली, यावेळी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भारत व महाराष्ट्र सरकारने लोकसभा व विधानसभा महिलांना ३० टक्के आरक्षण, मुस्लिम महिलांना त्रीपल तलाक पासून सुटका देणारा निर्णय, सैनिक शाळेत मुलींना प्रवेश, १० कोटी गरीब महिलांना मोफत गॅस, पंतप्रधान आवास योजना, सौचालय, किसान सन्मान योजनेचा लाभ, २४ कोटी गरीब महिलांचे मोफत जनधन बँक खाते, एसटी मध्ये प्रवास करतांना अर्धी तिकीट, लेक लाडली योजना असे अनेक महिलांच्या विकासा करिता निर्णय घेवुन भारतातील मातृशक्तीचा सन्मान केला आहे. या सर्व योजनांची माहिती प्रत्येक घरापर्यंत पोहचवावी, असे आवाहनही योगीता पिपरे यांनी यावेळी केले.

याप्रसंगी देवरी तालुक्यातील अंबिका आमोरा, प्रज्ञा सांगिडवार, नुतन सयाम, श्यामकला गावळ, अंजु बिसेन, रचना उजवेन, कल्पना वालोदे, अंजली दरवडे, ममता अंबादे, वैशाली पंधरे, प्रेरणा उके, मोसमी नैताम, आमगाव तालुक्यातील सुषमा भुजाडे, अर्चना मडावी, सूनदा उके, सरिता हरिनखेडे तसेच भाजपा महिला आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.





  Print






News - Gadchiroli




Related Photos