गोवरी येथे धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिर संपन्न


- मोठ्या संख्येने महिला सहभागी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / बल्लारपूर : भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर जिल्हा पश्चिम विभागाच्या राजुरा शाखेच्या अंतर्गत तक्षशिला बुद्ध विहार, गोवरी तहसील राजुरा येथे २४ मार्च ते २ एप्रिल २०२३ या कालावधीत धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचा समारोप कार्यक्रम २ एप्रिल २०२३ रोजी घेण्यात आला. या शिबिरात प्रथम गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून व त्रिशरण पंचशील घेऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपसिका महिलांनी सहभाग घेऊन धम्माचे प्रशिक्षण घेतले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतिय बौध्द महासभा राजुराचे तहसील अध्यक्ष धर्मू नागराळे यांनी केले. प्रामुख्याने विदर्भ प्रदेशाध्यक्ष अशोक घोटेकर, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष इंजि. नेताजी भरणे, शिबिर मार्गदर्शक केंद्रीय शिक्षिका कविता अलोने, जिल्हा उपाध्यक्ष प्रचार व पर्यटन विभाग सपना कुंभारे, केंद्र शिक्षिका गायत्री रामटेके, संदीप सोनोने, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रपूर, मिली वाघ, पंचफुला वेल्हे, अनुकला वाघमारे, केंद्र शिक्षिका गौतम चौरे, महासचिव भीमराव खोब्रागडे उपस्थित होते. सुरुवातीला दहा दिवसांच्या शिबिरात खूप काही शिकायला मिळाल्याचे महिला प्रशिक्षणार्थींनी सांगितले. अनिता कासवटे, अचल घागरगुंडे, वनिता करमणकर, अर्चना कासवटे यांनी मनोगत व्यक्त केले. रमाई महिला मंडळ गोवरी च्या अध्यक्षा कविता अलोने, जीवनकुमार अलोने यांचा करण्यात सत्कार आला .
News - Chandrapur