महिला आरजेला आक्षेपार्ह मेसेज पाठविणे वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला भोवले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : 
महिला आरजेला आक्षेपार्ह मेसेज पाठविणे वाहतूक शाखेच्या एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला चांगलेच भोवले. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी बुधवारी तडकाफडकी या निरीक्षकाची पोलिस नियंत्रण कक्षात बदली केली. 
बुधवारी या आरजेने व्हॉट्सॲपद्वारे या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाकडे वाहतूक शाखेचे नवनियुक्त उपायुक्त गजानन राजमाने यांचा मोबाइल क्रमांक मागितला. त्यावरून निरीक्षकाने तिला व्हिडीओ कॉल करण्यास सांगितले. 'व्हिडीओ कॉल कशासासाठी', असा प्रश्न आरजेने निरीक्षकाला केला. 'तू खूप ब्युटिफूल दिसते. डॅशिंग आहेस. तुझा चेहरा पाहावासा वाटतो', असा मेसेज पोलिस निरीक्षकाने आरजेला पाठविला. हा मेसेज वाचून आरजे संतापली. निरीक्षकाचे व्हॉट्सॲप मेसेज तिने चक्क सोशल मीडियावर पोस्ट केले. पोलिस आयुक्तांकडे तक्रारही केली. पोलिस आयुक्तांनी या घटनेची गंभीर दखल घेत वाहतूक शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांना चौकशी आदेश दिले. चौकशी पूर्ण होईपर्यंत या निरीक्षकाला पोलिस नियंत्रण कक्षात संलग्न करण्यात आले. आरजेने या निरीक्षकाविरुद्ध सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्येही तक्रार केली आहे.    Print


News - Nagpur | Posted : 2019-03-28


Related Photos