महत्वाच्या बातम्या

 शेंबळमध्ये जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांचा छापा : चार जुगारी अटकेत


- १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; काही जुगारी पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वी पसार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : शेंबळ येथील वॉर्ड क्रमांक ३ मधील सार्वजनिक रस्त्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत चार जुगाऱ्यांना अटक करण्यात आली असून, रोख रकमेसह ५२ पत्त्यांची गड्डी असा एकूण १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ६ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास करण्यात आली.

शेंबळ येथे काही जण ५२ पत्त्यांवर पैशांचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती वरोरा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचताच जुगार खेळणाऱ्या काही जणांनी तेथून पळ काढला. मात्र, चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये संदीप बालकृष्ण काले (४०, रा. पोहा, वरोरा), अरुण बापूराव खारकर (६१), संजय नानाजी धनमकर (५०, दोघेही रा. शेंबळ) तसेच राजेंद्र अरुण उपरे (४३, रा. आष्टी) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून ५२ पत्त्यांची गड्डी व ११ हजार ३०० रुपये रोख जप्त केले. त्यानंतर आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडूनही रोख रक्कम मिळून आली. अशाप्रकारे पोलिसांनी एकूण १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी वरोरा पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पसार झालेल्या जुगाऱ्यांचाही शोध घेतला जात असून, पुढील तपास पोलीस शिपाई गुलाब गावतुरे करीत आहेत.





  Print






Related Photos