अंत्यविधीसाठी नेत असलेली मुलगी निघाली जिवंत


- जळगाव जामोद तालुक्यात खळबळ 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बुलढाणा :
जळगाव जामोद तालुक्यातील पळशी सुपो येथील अपघातग्रस्त ६ वर्षीय अर्पिता दीपक दाभाडे हिला अंत्यविधीसाठी स्मशानभूमीमध्ये नेत असताना ती जिवंत असल्याची धक्कादायक घटना १६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजताचे दरम्यान लक्षात आली.  तिला पुढील उपचारार्थ अकोला येथे पाटविण्यात आले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
 दीपक महादेव दाभाडे (रा.पळशी सुपो) यांनी अर्पिता हिला अपघातग्रस्त अवस्थेत जळगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये १५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ४ वाजता दाखल केले.  तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारार्थ खामगाव येथे तिला हलविण्यात  आले. खामगाव येथील सिल्व्हरसिटी या खासगी रुग्णालयात तिला उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी १६ नोव्हेंबर रोजी दुपारी अर्पिताला पळशी येथे आणले व ती मृत झाली असे समजून तिचे अंत्यविधीची तयारी करण्यात आली . नातेवाईकांनी तिला संध्याकाळी पाच वाजेदरम्यान स्मशानात नेत असतांना ती  मुलगी जिवंत असल्याचे नातेवाईकांचे लक्षात आले. लगेच त्यांनी  स्थानिक डॉ. भोपळे यांना बोलावण्यात आले असता त्यांनी सदर मुलगी जीवंत असल्याचे सांगताच नातेवाईकांनी तिला घेऊन जळगाव ग्रामीण रुग्णालय गाठले. तेथे डॉक्टर केदार यांनी उपचार करून तिला पुढील उपचारार्थ अकोला हलविण्यात आले आहे . या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे .    Print


News - Rajy | Posted : 2018-11-17


Related Photos