शिक्षण विस्तार अधिकारी वसंत भिवगडे यांना निरोप
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली कार्यालयातील कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी वसंत भिवगडे हे सेवानिवृत्त झाल्याने ०१ डिसेंबर २०२२ ला स्थानिक शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, गडचिरोली येथील कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करुन त्यांना निरोप देण्यात आला. वयोमाना नुसार सेवानिवृत्त झाल्याने वसंत भिवगडे यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापीका कु. डी.एच. जुमणाके, कार्यक्रमाचे संचालन व आभार गुलाब डोंगरवार यांनी केले. कार्यक्रमाला जेष्ठ शिक्षक रामदास पिलारे, विलास मडावी, पी. एस.पाटील, यशपाल पेंदाम, पी. ए. कारेकर, कु. संगिता मोडक, कु. प्रतिभा बानाईत, संजय सातपुते, भुषण खोब्रागडे, साईनाथ सिडाम, कु. टेकाम, सर्व शिक्षक वस्तीगृह अधिक्षक / अधिक्षिका आणि वस्तीगृह चतुर्थ कर्मचारी उपस्थित होते.
News - Gadchiroli