महत्वाच्या बातम्या

 सकारात्मक दृष्टिकोनातूनच यश प्राप्ती : जि.प. माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम


- भगवंतराव महाविद्यालयात निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : विद्यार्थ्यांनी शालेय व महाविद्यालयीन जीवनात कठोर परिश्रम घ्यावे, विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. आई-वडील शिक्षकांचा आदर करण्याबरोबरच समाजातील मान्यवर व्यक्तींशी विनम्र रहावे. कठोर मेहनतीशिवाय या जगात काहीच नाही. कुठल्याही कामात सातत्य असल्याशिवाय येशोप्राप्ती नाही, असे प्रतिपादन माजी जि.प.अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी केले.

भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्ली येथे २६ एप्रिल रोजी बी. ए. व बीएससी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. प्रमुख अतिथी प्राचार्य डाँ.एस.एन. बुटे, मा.अँड. ज्योती ढोके, मा. डि.व्ही. पोटदुखे (प्राचार्य,भगवंतराव कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली), प्रा.डाँ. संदीप मैंद, प्रा.डाँ.सुधीर भगत, प्रा.डाँ.बि.डी. कोंगरे, प्रा.विनोद पत्तीवार, प्रा.डाँ.व्हि.ए. दरेकार, प्रा.निलेश दुर्गे, प्रा.राजीव डांगे, प्रा.भारत सोनकांबळे, प्रा,डाँ. श्रूती गुब्बावार, डाँ.स्वाती तंतरपाळे, प्रा.चिन्ना पुंगाटी, प्रा.अतुल बारसागडे, प्रा.राहूल ढबाले, प्रा.डाँ. साईनाथ वडस्कर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना म्हणाले कि, फक्त अभ्यासात चांगले गुण मिळविणे हे एकमेव ध्येय नसून एक उत्तम नागरिक होता आला पाहिजे. असे सांगून त्यांनी प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे व प्रत्येकात गुण दडलेले आहेत. फक्त ओळखता आला पाहिजे, हिरा कुठेही चमकतो तसेच माणूस मनापासून ठरवले तर सगळं करू शकतो. फक्त आयुष्यात आपले ध्येय निश्चित करून त्याप्रमाणे वाटचाल केली की कुठलीच गोष्ट अवघड नसते असे प्रगल्भ विचार विद्यार्थ्यांना सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प माल्यार्पण आणि दीप प्रज्वलित करून केले. इतरही मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच बीए व बीएससी अंतिम वर्षाच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन कु.गायत्री बुद्वावार तर आभार प्रदर्शन कु संध्या नरोटे हिने केले कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी तथा बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.


गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आल्याबद्दल सत्कार

कार्यक्रमात भाग्यश्री आत्राम यांचा गोंडवाना विद्यापीठ व्यवस्थापन मंडळा मधून सिनेट सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल भगवंतराव महाविद्यालय तर्फे त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos