महत्वाच्या बातम्या

 गुन्हेगाराकडुन १ देशी कट्टा व ५ जीवंत काडतुस जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्हयामध्ये होत असलेल्या अवैध धंदे, अवैध हत्यार बाळगणाऱ्या इसमाची माहीती काढुन त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश मुम्मका सुदर्शन पोलीस अधिक्षक चंद्रपूर, रिना जनंबधु अप्पर पोलीस अधिक्षक चंदपुर यांनी दिले होते. त्याची दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रपूर  महेश कोंडावार यांचा नेतृत्वात पथक अवैध रीत्या बाळगण्यावर माहीती काढुन त्यावर कार्यवाही करण्याची मोहीम राबवित होते. सदर मोहीमे दरम्यान पथकाला गोपनीय माहीती मिळाली कि, तुकुम तलाव, चंद्रपुर येथील के.जि.एन. पान सेंटर जवळ एक इसम आपले कमरेला गावटी बनावटीचे रिवॉल्वर लावुन उभा आहे. 

सदर माहीती वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ रवाना होवुन सदर इसमास ताब्यात घेवुन त्याची तपासणी केली असता सदर ईसमाच्या कमरेला लागुन असलेल्या काळया बैंग मध्ये एक गावटी बनावठीचे रिवॉल्वर व त्यात वापरण्यात येणारे ५ नग जीवंत काडतुस मिळुन आले. सदर इसमास त्याचे नाव विचारून क्राईम रेकॉर्ड चेक केले असता अनेक गुन्हे दाखल असल्याची माहीती मिळाली आहे. 

सदर इसमाविरूध्द पोस्टे रामनगर येथे कलम ३,२५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात येवुन आरोपी जुबेर साहेबअली शेख (२०) रा. लालपेठ कॉलरी नं. १, चंद्रपुर यांस पुढिल कायदेशीर कार्यवाहीकानी पोस्टे रामनगर यांच्या ताब्यात देण्यात आले.

सदरची यशस्वी कामगीरी पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रीना जनबंधू यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, यांचे नेतृत्वात सपोनि हर्षल एकरे, पोउपनि विनोद भुरले, पो.हवा. संजय आतकुलवार, नापोअ संतोष येलपुलवार, पो.अ, गोपाल आतकुलवार यांनी केली.





  Print






News - Chandrapur




Related Photos