गडचिरोली -चिमूर लोकसभा निवडणूक : १० जणांनी केले १८ अर्ज दाखल , छाननीमध्ये ४ उमेदवारांचे अर्ज बाद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
गडचिरोली -चिमूर लोकसभा मतदार संघातील निवडणूकीसाठी एकूण १० जणांनी १८ अर्ज सादर केले . मात्र ६ उमेदवारांनाच या निवडणुकीच्या रिंगणात उतरता येणार आहे. आज निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात आली . यामध्ये ४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे बाद करण्यात आली . त्यामुळे या उमेदवारांना गडचिरोली -चिमूर लोकसभा निवडणूकीला मुकावे लागणार आहे . 
नामदेव दल्लुजी उसेंडी- इंडियन नॅशनल काँग्रेस, देवराव मोनबा नन्नावरे- आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया , रमेशकुमार बाबुरावजी गजबे - वंचित बहुजन आघाडी,  अशोक महादेवराव नेते- भारतीय जनता पार्टी , नामदेव सदाराम किरसान-अपक्ष, नेवारे दामोधर वानुजी- अपक्ष , सुवर्णा बबनराव वरखडे-गोंडवाना गणतंत्र पार्टी, हरीषचंद्र नागोजी मंगाम- बहुजन समाज पार्टी, दिवाकर गुलाब पेंदाम- बहुजन मुक्ती पार्टी व पवन रामचंद्र मगरे- बहुजन समाज पार्टी अशा एकूण १० जणांनी १८ अर्ज सादर केले होते . आज जिल्हा निवडणूक शाखेमार्फत नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात आली. यामध्ये अशोक महादेवराव नेते- भारतीय जनता पार्टी , डॉ. नामदेव दल्लुजी उसेंडी- इंडियन नॅशनल काँग्रेस, हरीचंद्र नागोजी मंगाम- बहुजन समाज पार्टी, देवराव मोनबा नन्नावरे- आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया, डॉ. रमेशकुमार बाबुरावजी गजबे- वंचित बहुजन आघाडी, डॉ. किरसान एन.डी.- अपक्ष. या ६ उमेदवारांचे अर्ज वैद्य ठरविण्यात आले तर नेवारे दामोधर वानुजी- अपक्ष , सुवर्णा बबनराव वरखडे- गोंडवाना गणतंत्र पार्टी, दिवाकर गुलाब पेंदाम- बहुजन मुक्ती पार्टी व पवन रामचंद्र मगरे- बहुजन समाज पार्टी या चार उमेदवारांनी दाखल केलेले  नामनिर्देशन छाननी दरम्यान बाद करण्यात आले. त्यामुळे या उमेदवारांना गडचिरोली - चिमूर लोकसभा मतदारसंघात २०१९ ची निवडणूक लढविता येणार नाही. 
    Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-26


Related Photos