२६ ते २८ डिसेंबरदरम्यान राज्यात थंडीची लाट


वृत्तसंस्था / पुणे :   उत्तर व मध्य महाराष्ट्रात २६ ते २८ डिसेंबरदरम्यान थंडीची लाट येण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.  सध्या देशात पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि पूर्व मध्य प्रदेशात थंडीची लाट सुरू असून तेथून वाहणारे वारे महाराष्ट्रात येऊन धडकणार आहे.
उद्या २६ डिसेंबर पासून तीन दिवस उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक व नगर जिल्ह्यांत लाटेचा परिणाम जाणवेल. ओखी चक्रीवादळ, अवकाळी पाऊस, स्थानिक पातळीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर तयार झालेल्या ढगाळ वातावरणामुळे नोव्हेंबरनंतर थंडी गायब झाल्याचे चित्र होते. पुणे शहराचे किमान तापमान १८ अंश सेल्सिअसच्याही पुढे गेले होते. मात्र, मागील तीन ते चार दिवसांपासून शहरात थंडीचा कडाका वाढला आहे. पुढील तीन ते चार दिवस थंडीचा कडाका कायम राहणार आहे, तर तापमान १० अंशांपर्यंत जाणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने दिला आहे.  Print


News - Rajy | Posted : 2018-12-25


Related Photos