कोरची ग्रामीण रुग्णालयातील जनरेटर बनली शोभेची वस्तू


- अतिआवश्यक वेळीच सुरू केले जाते जनरेटर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / कोरची :
नेहमी भोंगळ कारभार करिता चर्चेत राहणाऱ्या ग्रामीण रुग्णालय कोरची येथे मोठ-मोठे जनरेटर असून सुद्धा ते फक्त अति आवश्यक वेळीच शुरू केळी जातात. मिळालेल्या माहितीनुसार डिझेलचा पुरवठा होत नसल्यामुळे सदर जनरेटर हे फक्त अतिआवश्यक वेळेत सुरू केले जाते त्यामुळे रुग्णांचे हाल होत असल्याचे बघीतले जात आहे. ग्रामीण रुग्णालयातील चांगल्या उपयोगी वस्तू बदलून त्या ठिकाणी नवीन वस्तू घेऊन लाखो रुपये वाया केले जात असून आवश्यक वस्तूंकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे.
 ग्रामीण रुग्णालय कोरची येथे नेहमी घाणीचे साम्राज्य बघितले जात असून यावर रुग्णाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील दोन वर्षापासून सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणूमुळे पहिलेच बहुतेक रुग्णांनी आपला जीव गमावला आहे व सर्वत्र स्वच्छतेचे संदेश देणारे आरोग्य विभागात घाणीचे साम्राज्य असल्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात ३० ऑगस्ट ते ६ सप्टेंबर पर्यंत कायाकल्प चमूचा दौरा असून 'कायाकल्प पुरस्कार' प्राप्त करण्याकरिता ग्रामीण रुग्णालय कोरची येथे बाहेरचे मजूर लावून युद्धपातळीवर साफसफाईचे कार्य सुरू असल्याचे दिसून येत आहे. रुग्णांना शौचालयात पाणी मिळत नसल्यामुळे त्यांना इकडे तिकडे भटकंती करावी लागत आहे. ग्रामीण रुग्णालय येथे सद्यस्थितीत दोन बोअर असून त्या बोअरच्या खोदकामात सुद्धा खूप मोठे भ्रष्टाचार झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. परिसर स्वच्छ ठेवन्याकरीता जर कायकल्प चमूची प्रतीक्षा केली जात असेल तर दर आठवड्याला अशा चमूने तालुक्यात भेट द्यावी अशी अपेक्षा रुग्णालयातर्फे केली जात आहे.
४ सप्टेंबरला अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समिती कोरचीच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालय कोरची येथे भेट दिली असता तापाने ग्रासलेल्या लहान चिमुकल्यांना त्यांच्या आई कापडाने हवा करीत असल्याचे दिसून आले. तर मग लाखो रुपयाची वस्तू ही फक्त रुग्णालयाची शोभा वाढवण्यासाठी आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
ग्रामीण रुग्णालय कोरची येथे रुग्णांना तातडीने मूलभूत सुविधा देण्यात यावी अन्यथा लवकरच आंदोलन केले जाईल असा इशारा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समिती कोरचीचे तालुका अध्यक्ष आशिष अग्रवाल, तालुका सचिव सिद्धू राऊत, शहर अध्यक्ष चेतन कराडे, जितेंद्र सहारे, श्‍याम यादव, अभिजित निंबेकर, धम्मदीप लाडे, चंदू वालदे, निखिल साखरे, भुमेश शेंडे, कृष्णा वंजारी, बंटी जनबंधू, भूषण तेलासी, पप्पू सिंन्हा आदींनी दिला आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-09-05
Related Photos