पक्ष संघटनेसाठी जिल्हयातील महिलांचे योगदान महत्वाचे : माजी नगराध्यक्षा योगिताताई पिपरे यांचे प्रतिपादन
- भाजपाच्या जिल्हा महिला मेळाव्याला गडचिरोली शहरातील व आदिवासी, दुर्गम भागातील महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम, नक्षलग्रस्त, आदिवासी भागातील महिला आपल्या कुटुंबाची जबाबदारी साभांळुन शेतीची कामे पाहुन दुर्गम भागातील महिलांना न्याय देण्यासाठी व त्यांना केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी व सरसकट लाभ देणाऱ्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत ते खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय वरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन साकारणाऱ्या विकसित व सुसंस्कृत भारत. सुजलाम-सुफलाम भारत व गरीब, शोषित, पिडीत लोकांच्या कल्याणासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची सुरू असलेली धडपड यांची जाण ठेवून आदिवासी जिल्हयातील ग्रामीण भागातील महिला लोकहितासाठी व सर्वदूर पसरलेल्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जे परिश्रम घेत आहेत. हे त्यांचे कार्य प्रशंसनीस आहे.
पक्ष संघटन वाढविण्यासाठी त्यांचे गेल्या कित्येक वर्षापासुन सुरू असलेले काम व त्यांनी केलेल्या परिश्रमामुळेच आज नगर परिषद, नगर पंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांमध्ये भाजपाची सत्ता असुन आमदार, खासदार तथा राज्यात व केंद्रांत भाजपाची सरकार आहे. त्यामुळेच पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र काम करणाऱ्या महिलांनी पक्षासाठी दिलेले योगदान महत्वाचे असल्याचे प्रतीपादन गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्षा तथा भाजपा महिला आघाडी ओबीसी मोर्चाच्या जिल्हा संयोजिका योगीताताई पिपरे यांनी केले. काल 14 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित जिल्हा महिला मेळाव्यात महिलांना मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक तथा उद्घाटक म्हणून भाजपच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा चित्राताई वाघ प्रामुख्याने उपस्थित होत्या. तर याच्या अध्यक्षस्थानी भाजपाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा तथा माजी जि. प. अध्यक्षा योगीताताई भांडेकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून महिला आघाडीच्या जिल्हा महामंत्री अर्चनाताई ढोरे, वर्षाताई शेडमाके, जिल्हा सचिव गिताताई हिंगे, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, गोंविंद सारडा, जिल्हा संपर्क प्रमुख सदानंद कुथे, भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, माजी जि.प. सदस्या तथा धानोरा तालुका अध्यक्षा लताताई पुंघाटे, प्रदेश सदस्या रेखाताई डोळस, भाजयुमो जिल्हा युवती प्रमुख प्रितीताई शंभरकर, आरमोरीच्या तालुकाध्यक्षा संगिताताई रेवतकर, सौ. शालुताई दंडवते, माजी नगराध्यक्षा, न.प. देसाईगंज भाजपाचे शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सौ. कविताताई उरकुडे, जिपच्या माजी सभापती रोशनीताई पारधी, अर्चनाताई बोरकुटे, गडचिरोली तालुका अध्यक्ष, माधवीताई पेशट्टीवार, चामोर्शी तालुका अध्यक्ष, जयश्रीताई मडावी, कुरखेडा तालुका अध्यक्ष, सौ. प्राजक्ता पेदापल्लीवार, अहेरी तालुका अध्यक्ष, निलकमल मोहुर्ले कोरची तालुका अध्यक्ष, प्रभाती भक्त मुलचेरा तालुका अध्यक्ष, रेवताताई अलोनी, वडसा तालुका अध्यक्ष उपस्थित होत्या.
News - Gadchiroli