पोस्ट खात्याच्या ग्रामीण डाकसेवकांनी पुकारला देशव्यापी संप, मंगळवारपासून डाक सेवा ठप्प


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
आधुनिक संचार माध्यमाच्या काळातही आपले अस्तित्व टिकवून असलेल्या पोस्ट खात्याच्या ग्रामीण डाकसेवकांनी देशव्यापी संप काल १८ डिसेंबर पासून पुकारला आहे. या संपात जिल्ह्यातील  पोस्टमन, पोस्टमास्तर सहभागी झाले आहेत. परिणामी ग्रामीण भागातील डाकसेवा ठप्प झाली आहे. 
ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक संघटना आणि नॅशनल युनीयन ऑफ ग्रामीण डाकसेवक संघटनेच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात गडचिरोली  जिल्ह्यातील डाकसेवक सहभागी झाले आहेत.  यामुळे  ग्रामीण भागातील मनीऑर्डर  सेवा, रजिस्ट्री पत्र, आरडी, वीज बिल भरणा, सुकन्या योजनेचे काम आजपासून ठप्प झाले आहेत.
 ग्रामीण डाकसेवकांना १ जानेवारीपासून सेवानिवृत्तीचे फायदे द्यावे, दीड लाखांऐवजी पाच लाख रुपये ग्रॅज्युएटी द्यावी, ३० दिवसांची पगारी रजा मंजूर करावी, शैक्षणिक भत्ता द्यावा, कमलेश चंद्रा कमिटीच्या शिफारसी मान्य कराव्या, सिंगल हँड ब्रँचेस अपग्रेड कराव्या, ग्रामीण डाकसेवक कर्मचाऱ्यांना आठ तासांचे काम देवून सिव्हील सर्व्हंड डिजीएस कर्मचारी करण्यात यावे, या मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-19


Related Photos