गडचिरोली जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून द्या
- आमदार डॉ. देवराव होळी यांचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्रीना देवेंद्र फडणवीस यांना निवेदन
- मुंबई मंत्रालयात भेट घेऊन विविध समस्यांबाबत केली चर्चा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीचे सरकार सत्तेत आल्यापासून पुन्हा जिल्ह्यात विकासाचे चक्र सुरू झाले असून मोठ्या प्रमाणामध्ये कामे सुरू आहेत. परंतु त्या कामांना आणखी गती मिळावी याकरिता जिल्ह्यातील असणाऱ्या मोठ्या सिंचन व ईतर प्रकल्पांना निधी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांना माध्यमातून केले.
यावेळी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे समन्वयक प्रमोद पिपरे, अहेरीचे माजी तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री प्रामुख्याने उपस्थित होते.
News - Gadchiroli