महत्वाच्या बातम्या

 युवा संवादसाठी संस्थांकडून अर्ज आमंत्रित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : नेहरू युवा केंद्र संगठनच्यावतीने युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्ह्यात तीन संस्थांची निवड केली जाणार आहे. यासाठी ईच्छूक समुदाय आधारित संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. पंचप्राण अमृत कालच्या युगात भारताची दृष्टी भारत @२०४७ या संदर्भात युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र संगठनच्यावतीने देशभर कार्यक्रम केले जात आहे. या अंतर्गतच जिल्ह्यामध्ये समुदाय आधारित संस्थांमार्फत युवा संवाद भारत@२०४७ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम टाऊन हॉल स्वरूपात आयोजित केला जाईल, ज्यामध्ये तज्ञ जाणकार व्यक्ती चर्चेचे नेतृत्व करतील. किमान ५०० युवकांच्या सहभागासह यामध्ये असेल. समुदाय आधारित संस्थांना कार्यक्रमाच्या आयोजनासाठी २० हजार पर्यंत निधी दिला जाईल. यासाठी अर्ज करू इच्छिणारे समुदाय आधारित संस्था कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसावी, कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पुरेशी संघटनात्मक साधने असणे आवश्यक, संस्थेवर कोणतेही फौजदारी खटले प्रलंबित नाही अशा तीन संस्था जिल्ह्यातून या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी निवडल्या जातील.

निकषांची पुर्तता करणाऱ्या इच्छुक संस्थांनी नेहरू युवा केंद्र वर्धा येथे २९ मार्च २०२३ पर्यंत अर्ज करावेत. अर्जाचा नमुना कार्यालयात विनामुल्य उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी नेहरू युवा केंद्र, व्हिआयपी रोड, गोपुरी वर्धा तसेच शिवधन शर्मा, जिल्हा युवा अधिकारी ७९८८०५२६५४, दुरध्वनी ०७१५२-२९५०६८ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos