गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करा : आ.डाॅ. देवराव होळी


- अधिकाऱ्यांना निर्देश देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिले पत्र
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
विधानसभा क्षेत्रातील धानोरा, गडचिरोली व चामोर्शी तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या पिकांचे सर्व्हेक्षण करून तातडीने गडचिरोली जिल्ह्याला दुष्काळग्रस्त घोषित करावे, अशा आशयाचे पत्र आमदार डाॅ. देवराव होळी यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंग यांना दिले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने शेतीच्या पिकांना धोका निर्माण झाला आहे. परिणामी जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेती पिकांचे सर्व्हेक्षण करून जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा. सर्व्हेक्षण करताना प्रत्यक्ष गाव किंवा मंडळाची आणेवारी काढताना स्थानिक लोकांना विश्वासात  घ्यावे व स्थानिक लोकप्रतिनिधी, सरपंच, पोलिस पाटील यांना विश्वासात घेतल्याशिवाय अंतिम आणेवारी घोषित करू नये याबाबत सर्व अधिकाऱ्यांना तातडीने निर्देश द्यावे,अशी मागणी आ.डाॅ. देवराव होळी यांनी केली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-31


Related Photos