नाफेडच्या चना खरेदी नोंदणीसाठी मुदतवाढ
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार हंगाम २०२२-२३ साठी जिल्ह्यात नाफेडच्यावतीने ८ केंद्रावरुन चना खरेदी करण्यात येत आहे. यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी चना विक्रीसाठी संबंधित खरेदी केंद्रावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील तालुका सहकारी खरेदी विक्री समिती, वर्धा, देवळी, पुलगाव, कारंजा व आष्टी तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट व समुद्रपूर आणि महा विदर्भ ॲग्रो प्रोड्युसर कंपनी जाम येथे आधारभूत दराने चना खरेदी केद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्रांवर जाऊन शेतकऱ्यांनी त्यांचे आधारकार्ड, सातबारा उतारा, पिक पेरा, आधारलिंक असलेले बँकेचे पासबुक घेऊन जाऊन एनईएमएल पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी, असे जिल्हा मार्केटींग अधिकारी यांनी कळविले आहे.
News - Wardha