महत्वाच्या बातम्या

 टायगर ग्रुपच्या गणेशोत्सवात हर्षवर्धन बाबा आत्राम, डॉ. मिताली ताई आत्राम यांच्या हस्ते पूजा-अर्चा


- किल्ल्याच्या प्रतिकृतीने सजला गणेश मंडप; भाविकांची गर्दी 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
तालुका प्रतिनिधी / अहेरी : आलापल्ली येथील टायगर ग्रुपच्या वतीने आयोजित श्री गणेश महोत्सवात भक्तिमय वातावरणात श्री गणरायाची पूजा व आरती अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य तथा युवा नेते हर्षवर्धनराव बाबा आत्राम व डॉ. मिताली ताई आत्राम यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी उपस्थित गणेशभक्तांनी आरतीमध्ये सहभागी होत श्री गणरायाचे दर्शन घेतले.

गणेशोत्सवानिमित्त टायगर ग्रुपच्या वतीने गणेश मंडपाची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. किल्ल्याच्या भव्य प्रतिकृतीसह भगवे ध्वज आणि आकर्षक विद्युत रोषणाईने मंडप परिसराचे विशेष आकर्षण वाढले आहे. सजावट पाहण्यासाठी तसेच श्री गणरायाच्या दर्शनासाठी नागरिक व गणेशभक्तांची उपस्थिती दिसून आली.

पूजा व आरतीनंतर हर्षवर्धनराव बाबा आत्राम व डॉ. मिताली ताई आत्राम यांच्या हस्ते भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी गणेशोत्सवाचा उत्साह आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले.

दरम्यान, गणेशोत्सवानिमित्त मियाम चारिट्रेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित आदिवासी रूट्स अँड रेसिपीज रेसिपी प्रदर्शनाच्या स्टॉललाही हर्षवर्धनराव बाबा आत्राम व डॉ. मिताली ताई आत्राम यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विविध खाद्यपदार्थांची पाहणी करून प्रदर्शनाची माहिती जाणून घेतली. यावेळी अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नागेश मडावी, सुरेंद्र अलोणे, कैलास कोरेत, बालाजी गावडे, सोमेश्वर रामटेके, सलीम शेख, आफ्रिदी सैय्यद यांच्यासह टायगर ग्रुपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व गणेशभक्त उपस्थित होते.





  Print






Related Photos