नवरगाव येथील श्री. ज्ञानेश कनिष्ठ महाविद्यालयातील मुलींचे कबड्डी स्पर्धेत घवघवीत यश


- प्रथम क्रमांक पटकावत विभागीय स्पर्धेसाठी संघाची निवड
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : जिल्हास्तरीय अंडर-१९ मुलींच्या कबड्डी क्रीडा स्पर्धेत सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील श्री ज्ञानेश कनिष्ठ महाविद्यालयातील मुलींनी सिदेवाही तालुक्याचे नेतृत्व करत उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर महाविद्यालयाच्या संघाची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
संघातील खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट सांघिक खेळ, शिस्त, जिद्द आणि आत्मविश्वासाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमृत लंजे कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा. गीता सोनवणे क्रीडा मार्गदर्शक समन्वयक प्रा. स्वप्निल बोरकर, प्रा. उषा वडपल्लीवार यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.




Petrol Price




