भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांचीही चौकशी होऊ शकते : चंद्रकांत पाटील


वृत्तसंस्था / पुणे  : 'सक्तवसुली संचालनालय (ईडी) ही स्वायत्त संस्था असून, भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांचीही चौकशी होऊ शकते,' असा गौप्यस्फोट महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केला. 
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत पाटील यांनी ही माहिती दिली. भाजपमध्ये प्रवेश करण्यात केलेल्यांची चौकशी होत नसल्याचा आरोप होत असल्याबाबत विचारणा करण्यात आली असता, पाटील म्हणाले, 'ईडी स्वायत्त संस्था आहे. त्यांच्याकडून दोन ते तीन वर्षे रेकी केल्यानंतरच चौकशी केली जाते. भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांचीही चौकशी होऊ शकते.' 
'पोलिसांच्या मुलांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी वसतिगृह बांधून देण्यात येणार आहे. त्यासाठी पाच कोटी रुपये देण्यात येणार आहेत़ हा निधी नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत दिला जाणार आहे़ पालखी तळांच्या ठिकाणी हर्बल औषध फवारणी आणि निर्जंतुकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रुग्णांचे कपडे, बेडशीट धुवण्यासाठी ससून रुग्णालयाला धुलाई यंत्रासाठी एक कोटी ३० लाख रुपये देण्याचा निर्णय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे,' असेही पाटील म्हणाले.    Print


News - Rajy | Posted : 2019-08-24


Related Photos