लोकसभा निवडणूकीदरम्यान पोलीस पाटलांची विविध बाबींवर राहणार नजर


- निवडणूक आयोगाने दिले निर्देश 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
लोकसभा निवडणूकीत गावच्या पोलीस पाटलांकडे निवडणूक आयोगाने मोठी जबाबदारी दिली आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये, निवडणुकीत पैशांच्या वाटपाला अंकुश लागावा, याकरिता पोलीस पाटलांकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.  
पोलीस पाटील हा गावाचा केंद्रबिंदू असल्याने गावातील सर्व घडामोडी त्यांना अवगत असतात. कोणता कार्यकर्ता कोणत्या राजकीय पक्षाचा आहे, अशा कार्यकर्त्यांकडे येणारी दिवसभराची प्रचार वाहने, चौकात लागणारे निवडणूक प्रचार फ्लेक्सबाबतची इत्यंभूत माहिती इत्यादी जबाबदारी पोलीस पाटलावर देण्यात आली आहे. निवडणूक लोकसभेची असली तरी प्रत्येक गावात गटातटाचे राजकारण असते. लोकसभा निवडणूकीतही मोठ्या प्रमाणात पैशांचा व्यवहार होतो. हा व्यवहार रोखून मतदारांनी निर्भीडपणे मतदानासाठी यावे, यासाठी निवडणूक आयोगाने हे पाऊल उचलले आहे. मोठ्या गावांतील किराणा दुकानावर तसेच कृषि सेवा केंद्रे, औषध दुकान, चहा टपरी, हॉटेल यांसह गावातील मुख्य बाजारओळीत पोलीस पाटलांना डिटेक्टिव्ह म्हणून नजर ठेवावी लागणार आहे. याकरीता पोलीसांकडून पोलीस पाटलांना आदर्श आचारसंहितासंदर्भात संपुर्ण माहिती दिल्या जाणार असून जबाबदारीची जाणिव करवून दिल्या जाणार आहे. निवडणूक आयोगाने तसे निर्देश जारी केले आहेत.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-13


Related Photos