महत्वाच्या बातम्या

 राज्यातील हंगामी स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी उपाययोजना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : राज्यातील बालकांचा मोफत सक्तीचे शिक्षण हक्क अधिनियम २००९ नुसार वय वर्ष ०६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास मोफत व सक्तीचे शिक्षण घेण्याचा हक्क आहे. असे असेल तरी राज्यात पालकांचे विविध व्यवसायाच्या निमित्याने होणारे स्थलांतर व त्यामुळे मुलांच्या प्राथमिक / माध्यमिक शिक्षणात खंड पडण्याची समस्या निर्माण होताना दिसत आहे. त्यातही मुलींचे प्रमाण वाढण्याची भीती जास्त आहे. सदर स्थलांतर साधारणत सप्टेंबर ते मे या कालावधीत होत असते. तसेच विटभट्टी दगडखान मजूर, कोडसाखाणी, शेतमजूरी, बांधकाम व्यवसाय, रस्ते, नाले जिगींन मिल इत्यादी प्रकारच्या कामानिमित्त विविध कामगार स्थलांतर करीत असतात. राज्यातील हंगामी स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी करावयाच्या उपाय योजना संदर्भात राज्यस्तरावर Standard Operating Procedure आदर्श संचालन प्रक्रिया तयार करण्यात आली आहे. सदर  SOP च्या अनुषंगाने त्यातील सूचनांचे तंतोतंत पालन करुन जिल्हयातील सर्व तालुक्यात स्थलांतरित मुलांचे सर्वेक्षण करणार आहे. सदर सर्वेक्षणात ०३ ते १८ या वयोगटातील बालकांचा समावेश आहे. हे सर्वेक्षण २० नोव्हेंबर ते ०५ डिसेंबर २०२२ या कालावधीत करणार आहे. असे शिक्षणाधिकारी प्राथ.जिल्हा परिषद गडचिरोली यांनी कळविले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos