२०२१ मध्ये देशात होणारी १६ वी जनगणना डिजिटल होणार


- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची माहिती 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
२०२१ मध्ये   देशात १६ वी जनगणना होणार असून ही  जनगणना   डिजिटल होणार आहे. जनगणना  ॲपच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. 
२०२१ ची जनगणना  स्वातंत्र्यानंतरची ८ वी जनगणना आहे. १६० वर्षानंतर जनगणनेच्या इतिहासात पहिल्यांदा ॲपमधून नागरिकांची माहिती गोळा केली जाणार आहे.   देशातील जनगणना ही दोन टप्प्यात होणार असल्याची माहिती केंद्र सरकारने मार्च महिन्यात दिली होती. सेन्सस २०२१ ची प्री टेस्ट १२ ऑगस्ट २०१९ पासून सुरू झाली होती. ती आता या महिन्याच्या अखेरीस संपणार आहे. जनगणना करण्यासाठी एकूण ३३ लाख लोकांची मदत घेतली जाणार आहे. ही सर्व लोक घराघरांत जाऊन सर्व माहिती गोळा करतील. जनगणना एकून १६ भाषेत केली जाणार आहे. जनगणना करणे हे कंटाळवाने काम नाही. यातून सरकारच्या योजना पोहोचतात. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदनी (एनपीआर) च्या मदतीने सरकारला देशातील समस्यांची माहिती समजण्यासाठी मदत होत असते.  Print


News - World | Posted : 2019-09-23


Related Photos