आरमोरी येथे काँग्रेस बैठक तथा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन
- मिलिंद खोब्रागडे तालुका कांग्रेस अध्यक्ष तथा नगरसेवक आरमोरी यांचे प्रतिपादन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : कांग्रेस पक्षाचे यूवा नेते खा. राहूल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा यशस्वी आयोजनानंतर उपक्रमाचा पूढील टप्पा हात से हात जोडो अभियान जिल्हयात राबविण्यात येणार आहे. याकरीता आरमोरी येथे शनिवार २८ जानेवारी २०२३ ला राजीव भवन (कृषी उत्पन्न बाजार समिती आरमोरी) येथे दूपारी २:०० वाजता तालुका स्तरीय नियोजन बैठक कार्यकर्ता मेळावाचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीला विधान परिषद आमदार अभिजित वंजारी, कांग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष महेन्द्र ब्राम्हणवाडे व जिल्हयातील पक्षाचे सर्व आजी-माजी खासदार, आमदार तसेच पक्षाचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रीय कांग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, पक्षाचे आजी-माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी, नगर परिषद सदस्य, आगामी जिल्हापरिषद पंचायत समिती करीता पक्षातर्फे निवडणूकीकरीता ईच्छूक उमेदवार तसेच सर्व सेल आणी समितीच्या पदाधिकारी उपस्तित राहावे, असे कळविण्यात येत आहे.
News - Gadchiroli