महत्वाच्या बातम्या

 तांबडा टोला येथे होणार सिमेंट रस्त्याचे बांधकाम


- माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : अतिदुर्गम व आदिवासीबहुल तांबडा टोला येथे सिमेंट रस्त्याचे बांधकाम होणार असून नुकतेच माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

गेदा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या विविध गावांत अनेक विकासात्मक कामे केली जात आहे. त्यासाठी भाग्यश्री यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिले आहे. तांबडा टोला येथे सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली होती. ही मागणी मंजूर झाली असून लालसू लेकामी यांच्या घरापासून डोलू पोई यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करण्यात येणार आहे.

पावसाळ्यात गावात चिखलाचे साम्राज्य निर्माण होत असल्याने गावकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. आता सिमेंट रस्त्याचे काम होणार असल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त करून भाग्यश्री आत्राम यांचे आभार मानले.

भूमिपूजन प्रसंगी माजी प.स. सभापती बेबी लेकामी, संभाजी हीचामी, सामाजिक कार्यकर्ते जयराज हलगेकर, भूमिया लालसू लेकामी, गाव पाटील लालू लेकामी, रामा हेडो, सैनू गावडे, चमरी गावडे, जैलो लेकामी, रसो गावडे, मनीं हेडो, मेथे हेडो, महारी गावडे, सुनीता गावडे, अंदे लेकामी आदी गावातील नागरिक उपस्थित होते.

  Print


News - Gadchiroli
Related Photos