लाचखोर सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यास कारावासाची शिक्षा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा  :
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा भंडारा येथील लाचखोर सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यास जिल्हा सत्र न्यायाधीश राजारामजी पांडे यांनी १९ जानेवारी रोजी ७ लाप्रका अंतर्गत एक वर्ष सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे . दामोधर शंकर नेवारे (५३) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या लाचखोर सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांचे नाव आहे . 
तक्रारदार यांचेकडून बचत गटाचे अनुदान मंजूर करून चेक देणेकामी आरोपी दामोधर शंकर नेवारे यांनी तक्रारदार यांना ५ हजार रुपयांची लाचेची मागणी करून स्विकारल्याने त्यांचे विरूध्द दि. १७ सप्टेंबर रोजी पोस्टे भंडारा येथे अ.क्र. ३१६५/१० कलम ७, १३, (१) (ड), सह कलम १३ (2) ला.प्र.का. १९८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास पुर्ण करून न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात आले. जिल्हा सत्र न्यायाधिश  -१, तथा विषेष न्यायधिश राजारामजी पांडे यांचे न्यायालयात सदर खटला चालविण्यात आला.  न्यायालयाने आरोपी दामोधर शंकर नेवारे   याला एक वर्ष सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे 
  सदर गुन्ह्याचा तपास  डब्लू जी. सुर्यवंशी, तत्कालीन पोलीस उप अधिक्षक, नापोशी भाऊराव वाडीभस्मे लाप्रवि भंडारा यांनी पुर्ण करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षाचे वतीने जिल्हा शासकीय अभियोक्ता   विनोद भोले यांनी काम पाहिले व त्यांना महेश चाटे, पोलीस उपअधीक्षक  योगेश्वर पारधी, पोलीस निरीक्षक, स.फौ. गणेश  पडलवार व पोहवा रविन्द्र गभने, लाप्रवि. भंडारा यांनी सहाय्य केले.
   Print


News - Bhandara | Posted : 2019-01-21


Related Photos