गडचिरोली जिल्ह्यातील पूरस्थिती आटोक्यात, अनेक मार्ग सुरू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे अनेक मार्ग बंद पडले होते. आता हळूहळू स्थिती पूर्वपदावर येत असून अनेक मार्ग सुरू झाले आहेत. भामरागड तालुक्यातील बांडीया आणि पर्लकोटा नदीला पूर असून उद्यापर्यंत पूर ओसरण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील तब्बल १७ मार्ग बंद पडले होते. यामुळे अनेक वाहने खोळंबून पडले होते. नागपूर - गडचिरोली, गडचिरोली - चामोर्शी, आष्टी - आलापल्ली, वैरागड - रांगी - धानोरा, देसाईगंज - कुरखेडा, तसेच जिल्ह्यातील इतर अनेक मार्ग रात्रीपासूनच सुरू झाले. आष्टी - चंद्रपूर मार्गावर सकाळी ११ वाजतापर्यंत पूर होता. आता हा मार्ग सुध्दा सुरळीत सुरू झाला आहे. 
भामरागड तालुक्यातील बांडीया नदीचे पाणी ओसरत आहे. हेमलकसा येथून भामरागड येथील नेटवर्क सुरळीत करण्याचे काम करण्यात येत आहे. वैनगंगा, गोदावरी नदीतील पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. काही भागात रिमझीम पाउस आहे. मात्र परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-08


Related Photos