क्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांच्या जयंती निमित्त निघालेल्या शोभायात्राचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत


- शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांना शितपेयाचे वाटप
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती निमित्त निघालेल्या शोभायात्रेचे जटपूरा गेट येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत सहभागी मातंग समाज बांधवांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शितपेयाची व्यवस्था करण्यात आली होती.
क्रांतीगुरू वस्ताद साळवे यांच्या २२८ व्या जयंती निमित्त मातंग समाजाच्या वतीने शोभयायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शहराच्या मुख्य मार्गाने निघालेली ही शोभायात्रा जटपूरा गेटला वळसा घालुन पुन्हा गांधी चौकात पोहोचली. दरम्यान सदर शोभायात्रेच्या स्वागताची यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जटपूरा गेट येथे तयारी करण्यात आली होती. शोभायात्रा सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान स्वागत स्थळी म्हणजेच जटपूरा गेट जवळ पोहचताच यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शोभयात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेला पूष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांना शितपेय वाटप करत क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे युथ शहर अध्यक्ष कलाकार मल्लारप, राशेद हुसेन, विलास वनकर, सतनाम सिंग मिरधा, दिनेश इंगळे, किशोर बोलमवार, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, विमल कातकर, अल्का मेश्राम, विलास सोमलवार आदिंची उपस्थिती होती.
News - Chandrapur