महत्वाच्या बातम्या

 फुले - आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क गडचिरोली रा.से.यो. विशेष श्रमसंस्कार व ग्रामीण शिबीर उद्घाटन समारंभ संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : ७ फेब्रुवारी २०२३ रोजी फुले आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क गडचिरोलीचे विशेष श्रमसंस्कार व ग्रामीण शिबिराच्या उद्घाटन समारंभ जांभळी येथे पार पडला.

श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित फुले -आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क गडचिरोली सत्र २०२२-२०२३ चे विशेष श्रमसंस्कार व ग्रामीण शिबीर ६ फेब्रुवारी २०२३ ते १२ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत मौजा जांभळी या गावात आयोजित करण्यात आले असून या शिबिराचा उद्घाटन समारंभ ७ फेब्रुवारी २०२३ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ. श्याम खंडारे रो.से.यो. संचालक, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली हे उपस्थित आपल्या उद्घाटनिय भाषणात त्यांनी विद्यापीठ तथा कुलगुरू महोदय गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली हे आपल्या समस्या सोडवण्यासाठी आपल्या गावात विधायक कार्य घडवण्यासाठी समस्यांवर उपाय शोधण्यासाठी बांधिल असून आपल्या सर्वांच्या सहकार्य आणि सहभागाशिवाय कार्य करणे शक्य नाही. आमचे युनिट म्हणजे शिबीरार्थी संख्या ५० ची असली तरी ५००० लोकांचे कार्य करण्याची जिद्द ठेवते. त्याला आपल्या साथीची आवश्यकता आहे. असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले. या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष भाषणात फुले-आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश के. खंगार यांनी असे मत व्यक्त केले की, ग्राम विकासाचा आधार युवक आहे. विकासामध्ये युवकांचा सहभाग असल्याशिवाय कोणताही विकास शक्य नसतो, म्हणून समस्त जांभळी गावातील युवकांनी शिबिरादरम्यान सक्रिय राहून विविध उपक्रम पार पाडण्यास यशस्वी करण्यास सहकार्य करावे. युवक हा विकासाचे प्रतीक असल्यामुळे युवकांनी व्यसनमुक्तीसाठी अहोरात्र झटले पाहिजे. तरच उद्याचा उज्वल भारत घडणे शक्य आहे. असे मनोगत अध्यक्षांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून दै. पुण्यनगरी चे जिल्हा प्रतिनिधी प्रल्हाद मशाखेत्री उपस्थित असून ग्रामस्थ आणि शिबिरार्थी यांच्या समन्वयातून ग्राम विकासाचे कार्य घडणे शक्य आहे. असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली सिनेट सदस्य डॉ. विवेक गोर्लावर गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, सिनेट सदस्य डॉ. रुपेंद्रकुमार गौर हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन ग्रामस्थांना विद्यार्थ्यांसोबत समन्वय साधून कार्य करण्याचे आवाहन केले. तसेच या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितांमधे ग्रामपंचायत जांभळी चे सरपंच विलास कुमरे तसेच उपसरपंच पुरुषोत्तम बावणे, या गावचे पोलीस पाटील कुणाल उसेंडी, सौ. दर्शना बाळेकरमकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती जांभळी, सौ. ममता पूजेलवार, सौ. कमलेश्वरी उसेंडी, तथा समस्त ग्रामपंचायत सदस्य जांभळी सोबतच फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क गडचिरोलीचे समस्त प्राध्यापकरुंद, शिक्षकेतर कर्मचारी तथा ग्रंथालयीन कर्मचारी उपस्थित होते.

या उद्घाटनियसोहळ्यास समस्त जांभळी गावचे नागरिक उपस्थित असून या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिबिर समन्वयक प्रा. दिपक तायडे यांनी केले.  तर आभार प्रदर्शन शिबिर समन्वयक प्रा. हितेश चरडे यांनी केले.

अत्यंत उत्साहात ग्रामस्थ, समस्त अतिथी गण, शिबिरार्थी या सर्वांच्या साक्षीने सहभागाने उत्साहाच्या वातावरणात हा उद्घाटनीय सोहळा पार पडला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos