गडचिरोली येथे जन आरोग्य समित्यांना प्रशिक्षण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : ०८ जानेवारी २०२३ ला गडचिरोली तालुक्यातील उपकेंद्र स्तरीय जन आरोग्य समिती सदस्यांना गडचिरोली येथे प्रशिक्षण देण्यात आले.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, स्तापी संस्था पुणे व आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडा अंतर्गत आरोग्यासाठी सामाजिक कृती प्रकल्प अंतर्गत जन आरोग्य समिती सदस्यांचे प्रशिक्षण आदिवासी जंगल कामगार सहकारी संस्था गडचिरोली येथे घेण्यात आले. प्रशिक्षणात प्राथमिक आरोग्य केंद्र पोटेगाव, बोदली व प्राथमिक आरोग्य केंद्र पोर्ला अंतर्गत येत असलेल्या आरोग्य वर्धिनी उपकेंद्र येथील जन आरोग्य समिती सदस्यांना एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.
प्रकल्पाच्या माध्यमातून आरोग्य सेवा लोकाभिमुख व्हाव्यात, आरोग्य सेवांचा दर्जा उंचवावा याकरिता प्रयत्न सुरु आहे. या प्रयत्नाला जोड देण्याकरिता गावपातळीवर ग्राम आरोग्य, पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती कार्यरत असते, त्याचप्रमाणे उपकेंद्र स्तरावर जन आरोग्य समिती कार्यरत आहेत. या समितीच्या माध्यमातून आरोग्य सेवा बळकट व्हाव्ह्यात व लोकसहभाग वाढावा याकरिता या समितीतील सदस्यांच्या काय भूमिका आहेत ते या प्रशिक्षणाच्या माध्यमातून सुरु आहे.
यावेळी डॉ. दिक्षांत मेश्राम जि.प. गडचिरोली, प्रकल्प जिल्हा सुपरवायझर विजयालक्ष्मी वघारे, प्रकल्प तालुका समन्वयक संदीप लाडे, सरपंच, CHO, आरोग्य सेविका, बचत गट महिला, आशा वर्कर, ग्राम आरोग्य दूत, व समिती सदस्य उपस्थित होते.
सदर प्रशिक्षणात मार्गदर्शक डॉ. दिक्षांत मेश्राम यांनी जन आरोग्य समिती मासिक बैठका नियमित होऊन गावातील आरोग्यावर चर्चा होणे खूप आवश्यक आहे, व या प्रक्रियेत गावातील लोकांचा सहभाग महत्वाचा आहे असे सांगितले. प्रमुख प्रशिक्षक म्हणून जिल्हा सुपरवायझर विजयालक्ष्मी वघारे यांनी जन आरोग्य समितीची, भूमिका, जबाबदाऱ्यां, कार्य, निधीचा उपयोग इत्यादी विषयावर प्रशिक्षण दिले.
त्याचप्रमाणे समिती तयार करण्यामागचे उद्देश, समितीचा निधी रुग्णाच्या कल्याणासाठी खर्च व्हायला पाहिजे, कुठल्या गोष्ठी साठी या निधीचा उपयोग करू नये, तसेच गावात वाढलेले आजाराचे प्रमाण यावर समिती बैठका मध्ये चर्चा करून प्रतिबंधात्मक उपाय करण्यात यावे. या विषयावर प्रशिक्षण दिले. CHO नी त्यांना येत असलेल्या अडचणी प्रशिक्षणात मांडले. निधीची कमतरता, पुरेसा औषध साठा उपलब्ध होत नाही इ. प्रशिक्षणाचे संचालन, आरोग्यासाठी सामाजिक कृती प्रकल्पाचे उद्देश व आभार संदीप लाडे यांनी केले.
News - Gadchiroli