महत्वाच्या बातम्या

 निवडणूक काळात मद्य परवान्याची बंदी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : ०८ वर्धा लोकसभा निवडणूकीसाठी २६ एप्रिल रोजी मतदार होणार असून ४ जून रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार मतदान संपन्याच्या वेळेपुर्वीचे ४८ तास व मतमोजणीचे दिवशी मद्य परवाना (अनुज्ञप्ती) बंद राहणार आहे.

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५ (C) व महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम १४२ (१) अन्वये जिल्हाधिकारी, वर्धा यांनी महाराष्ट्र विदेशी मद्य (रोखीने विक्री) (विक्रीच्या नोंदवह्या इत्यादी) नियम १९६९ च्या नियम ९ ए (सी) (१) मधील तरतुदीनुसार वर्धा जिल्ह्यातील सर्व नमुना एफएल-२ अनुज्ञप्ती दर्शविलेल्या २४ एप्रिल २०२४ च्या संध्याकाळी ६ वाजता पासून ते २६ एप्रिल २०२४ रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत, तसेच ४ जून २०२४ रोजी मतमोजणीचा संपूर्ण दिवस याकालावधीमध्ये मद्य परवाना (अनुज्ञप्ती) बंद राहणार आहे.

सदर आदेशाचा व नियमातील तरतुदीचा जे अनुज्ञप्तीधारक भंग करतील त्यांचे विरुध्द नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos