महत्वाच्या बातम्या

 देसाईगंज तालुक्यातील फव्वारा चौकात रामदास आठवलेंच्या प्रतिमेचे दहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : केंद्रीय समाजकल्यान राज्यमंत्री नाम रामदास आठवले यांनी ४ च्या पत्रकार परिषदेत डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी इच्छा नसतांना बौद्ध धम्म स्विकारला या वक्तव्याचे तिव्र पडसाद देसाईगंज येथे उमटले असुन आंबेडकरी जनतेने देसाईगंज येथिल फव्वारा चौकात ६ ला सायंकाळी रामदास आठवलेंच्या धिक्काराच्या घोषणा देत त्यांच्या प्रतिमेचे दहन केले.

सविस्तर वृत्त असे की धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पुर्व संध्येला केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धर्मांतराविषयी अतिषय निंदनिय असे वक्तव्य केले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना आठवले म्हणाले की, बाबासाहेंना हिंदु धर्म सोडायचा न्हवता इच्छा नसतांना बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्विकारला हा विषय प्रसारमाध्यमात प्रसारित होताच देसाईगंज येथिल बौद्ध समाज कोअर कमेटीच्या वतिने समाज बांधवांना एकञित आनुण या वक्तव्याचा निषेध नोंदविण्याची भुमिका घेतली. यासाठी विजय बन्सोड, डाकराम वाघमारे, राजरतन मेश्राम, प्रकाश सांगोळे यांचेसह बौद्ध समाज कोअर कमेटीच्या सर्व सभासदांनी देसाईगंज शहरातिल जनतेला एकञ येण्याचे आवाहन करताच ॲड बाळकृष्ण बांबोळकर, अशोक बोदेले, जगदिश बद्रे, नरेन्द्र मेश्राम, कुशाबराव लोणारे, हंसराज लांडगे, साजन मेश्राम दिलिप उके, बोदेले, मिना शेंडे, द्रोपदी सुखदेवे, कल्पना वासनिक यांचेसह शेकडो समाज बांधवांनी देसाईगंज येथिल फव्वारा चौकात उपस्थित होउन रामदास आठवले यांच्या धिक्काराच्या घोषना देत प्रतिमेचे दहन केले. एके काळी आंबेडकरी विचाराची सिंहगर्जना म्हनुण ओळख असलेल्या रामदास आठवले यांनी सत्तेसह प्रतिगामी विचारसरणींचे मांडलिकत्व स्विकारले असल्याचे दिसुन येत असल्याचे वक्तव्य आंबेडकरी चळवळीचे खंदे पुरस्कर्ते अशोक बोदेले यांनी या धिक्कार सभेत व्यक्त केले. या सभेला देसाईगंज शहरातिल आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. 

  Print


News - Gadchiroli
Related Photos