१९ वर्षीय शालेय हॅन्डबाॅल स्पर्धेत साहिल परसवार ची राष्ट्रीय संघात निवड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / सावली
: नागपूर येथे २ ते ४ डिसेंबर या कालावधीत पार पडलेल्या राज्यस्तरीय हॅन्डबाॅल स्पर्धेत क्रीडा प्रबोधीनी नागपूर संघाला विजेतेपद मिळाले असून साहिल राजू परसवार याची राष्ट्रीय संघात निवड झाली आहे. 
साहिल ने आपल्या यशाचे श्रेय आई वडील, नागपूर क्रीडा प्रबोधीनीचे प्रशिक्षक करंबे, मेश्राम, लांडगे यांना दिले आहे. प्रशिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळेच यश संपादन करता आल्याचे त्याने म्हटले आहे. साहिलचे वडील मुल पंचायत समितीमध्ये सहाय्यक गटविकास अधिकारी पदावर कार्यरत आहेत. त्याच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

   Print


News - Chandrapur | Posted : 2018-12-08


Related Photos