छोट्या व्यवसायाचे रूपांतर मोठ्या उद्योगात करा : बँक ऑफ महाराष्ट्राचे महाव्यवस्थापक विजय कांबळे
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : कुक्कुटपालन सारख्या छोट्याश्या व्यवसायातूनच मोठमोठे उद्योग उभारता येतात त्यामुळे प्रथम लहानसा व्यवसाय सुरु करावा त्यात अनुभव येत जाईल आणि आपोआप आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल असे उदगार बँक ऑफ महाराष्ट्राचे महाव्यवस्थापक आणि राज्य स्तरीय बँकर्स समीतीचे कार्यवाहक विजय कांबळे यांनी काढले. ते ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजीत आणि बँक ऑफ इंडिया द्वारा संचालीत ग्रामीण स्वरोजगार प्राशिक्षण संस्था (आरसेटी ) गडचिरोली येथे कुक्कूट पालन या दहा दिवसीय निवासी प्रशिक्षणाच्या समारोपीय कार्यक्रमात प्रमूख अतिथी म्हणून बोलत होते.
गडचिरोली येथे बँकर्स समितीच्या सभेला उपस्थित राहण्याकरीता आले असता त्यांनी आरसेटी गडचिरोली येथे भेट दिली. या प्रसंगी अग्रणी जिल्हा प्रबंधक युवगज टेंभूर्णे, आरसेटीचे संचालक कैलाश बोलगमवार, वरीष्ठ कार्यक्रम समन्वयक हेमंत मेश्राम व पुरुषोत्तम कुनघाडकर, आरसेटी श्रेष्ठता केंद्राचे प्रतिनिधी पुंडलीक काटकर व भूषण मेश्राम आणि ३५ नवउद्योजक उपस्थित होते.
दहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात उद्योजकता व कुक्कुट पालनाचे तांत्रिक दृष्ट्या प्रशिक्षण देण्यात आले. या करीता डॉ. नरेश आलाम, हर्षाली नैताम तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे प्रफूल भोपये यांचे सहकार्य लाभले. आरसेटीचेच माजी विद्यार्थी शाहरुख पठाण यांचे पोल्ट्रीफार्म वर क्षेत्रभेटीचे आयोजन करून प्रत्यक्ष अभ्यास करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन कार्यक्रम समन्वयक हेमंत मेश्राम यांनी केले.
News - Gadchiroli