महत्वाच्या बातम्या

 पांढरापानी येथे दहावी शिक्षण परिषद संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : कोरची केंद्राची दहावी शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांढरापाणी येथे पार पडली. हिराजी रामटेके केंद्रप्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रप्रकाश बिसेन, ताराचंद बल्हारे, भुषणकुमार मेश्राम, बंडू नागरे, प्रतिभा भेन्डारकर, सोनाली सोरते, सुभाष गहाणे, दिलीप नाकाडे, विनोद भजने यांच्या प्रमुख उपस्थितीत जि प प्राथमिक शाळा पांढरापाणी येथे आयोजित करण्यात आले होते. सदर शिक्षण परिषदेत कोरची केंद्राचे केंद्रप्रमुख हिराजी रामटेके यांचा आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांकडून शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आले.  

दरम्यान परिषदेत फुलोरा सुलभक यांनी फुलोरा मूल्यमापन संदर्भात मार्गदर्शन केले.

प्रशासकीय बाबींवर मार्गदर्शन मा. हीराजी रामटेके सर केंद्र प्रमुख यांनी मार्गदर्शन केले. 

शाळा पूर्व तयारी बाबत मार्गदर्शन वामन धनबाते व किशोर कुथे यांनी केले. 

कार्यक्रमाचे संचलन जितेंद्र साहाळा यांनी तर आभार प्रदर्शन चंद्रप्रकाश बिसेन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशश्वितेसाठी संतोष टिकले, सिताराम होळी, फ़त्तेसाय होळी, शशिकला काटेन्गे, सुलभा लांडगे यांनी सहकार्य केले. विशेष म्हणजे शिक्षण परिषदेत आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांकडून स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos