१४ महिन्यांच्या चिमुरडीवर बिहारी इसमाकडून अत्याचार : गुजरातवासीय संतप्त, उत्तरप्रदेश, बिहारींवर हल्ले


- आतापर्यंत ३४२ जणांना अटक
वृत्तसंस्था / अहमदाबाद :
गुजरात राज्यातील हिम्मतनगर मध्ये २८ सप्टेंबर रोजी एका १४ महिन्याच्या चिमूरडीवर बलात्कार करण्यात आला. या घटनेनंतर एका बिहारी व्यक्तीला अटक करण्यात आली. यामुळे गुजरात मधील नागरिक संतप्त झाले आहेत. घटनेनंतर  गुजरातमधील संतप्त नागरिकांनी उत्तरप्रदेश आणि बिहार च्या लोकांवर हल्ले सुरू केले आहे. बिहारींना  पिटाळून लावले जात आहे. या प्रकरणात तब्बल ३४२ लोकांना अटक करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. युपी-बिहारी नागरिकांना लवकरात लवकर गुजरात सोडून देण्याचा इशाराही देण्यात आला. याबाबतचे काही व्हीडिओही व्हायरल झाले आहेत. त्यानंतर, जवळपास ५० हजार उत्तर भारतीयांनी गुजरात सोडल्याचे समजते. 

गुजरातमधील अनेक भागात राहणाऱ्या उत्तर प्रदेश आणि बिहारमधील नागरिकांवर रोष व्यक्त केल्या जात आहे. गांधीनगर, अहमदाबाद, पाटना, साबरकांठा, मेहसाना आदी भागातील शेकडो परप्रांतीय नागरिक आपले काम सोडून आपआपल्या राज्यात रवाना होत आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहारी नागरिकांच्या मनात प्रचंड भिती निर्माण झाली आहे. सोशल मिडीयावर उत्तर प्रदेश आणि बिहारी नागरिकांविरोधात रोष व्यक्त करीत भडकविल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. हिंसात्मक प्रकार मेहसाना आणि साबरकांठा मध्ये अधिक असल्याचे पोलिस विभागाने म्हटले आहे. आतापर्यंत ४२ गुन्हे दाखल  करण्यात आले आहेत. काही भागामध्ये सिआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. सोशल मिडीयावर अफवा पसरविणाऱ्यांवर सुद्धा गुन्हे दाखल केले जात आहेत. 

 

   Print


News - World | Posted : 2018-10-08


Related Photos