महत्वाच्या बातम्या

 अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या : माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : अहेरी तालुक्यातील मागील महिन्यात अवकाळी पावसामुळे कोरेल्ली ( बु ) येथील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या धान पिकाचे मोट्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यावेळी तलाठी, कोतवाली प्रत्यक्ष शेतीचे पाहणी करून पंचनामा करून तहसील कार्यालयाकडे पाठवण्यात आले होते. बाकी सर्व साजातील नुकसान भरपाई मिळाले आहे. परंतु अजून सुद्धा कोरेल्ली (बु) साजातील शेतकऱ्यांना आज पर्यंत नुकसान भरपाई मिळाले नाही. कोरेल्ली (बु) येथील शेतकऱ्यांचा लाभार्थीचे नुकसान ग्रस्त यादी मध्ये नवे असून सुद्धा आज पर्यंत कोरेल्ली येथे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाले नाही. नुकसान ग्रस्त शेतकरी वांरवार महसूल विभागाच्या कर्मचारी, अधिकार्यांकडे चक्कर मारले मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे वरिष्ठानी लवकरात - लवकर चौकशी करून कोरेल्ली (बु) शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांनी शेतकरी सहित अहेरी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आली. जर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाही मिळाल्यास 11 एप्रिल 2023 रोजी शेतकऱ्यांना घेऊन तहसील कार्यालय समोर उपोषण करण्यात येईल. अशी इशारा माजी जि.प.अध्यक्ष यांनी निवेदनातून म्हंटले आहे. 

यावेळी अतिवृष्टी शेतकरी आनंदराव दुर्गे, कपिलदेव आत्राम, शिवराम चांदेकर, शिवराम गर्गम, राकेश वेलदी, लक्ष्मण कुळमेथे, केसा आत्राम, कारे मडावी, चौतु आत्राम, नामदेव गावडे, बिचे मडावी, बाजू कुळमेथे, लूला गावडे, शामू आत्राम, म्हरू गावडे, लालसू पुंगाटी, दमा गावडे, राकेश सडमेक सह आविसं अजय मित्र परिवारचे कार्यकर्ते पदाधिकारी व कोरेल्ली नुकसान ग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos