मुंबईच्या चिंचपोकळी गणेश मंडळाकडून पूरग्रस्तांना ५ लाखांची मदत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
मुंबईच्या चिंचपोकळी गणेश उत्सव मंडळाला यंदा १०० वर्ष पूर्ण होत आहे. आज या चिंतामणीचा आगमन सोहळा मुंबई पार पडला. यावेळी राज्यातील पूरपरिस्थितीची जाण ठेवून गणेश मंडळाकडून पूरग्रस्तांना ५ लाखांची मदत करण्यात येत आहे. तसेच यंदा गणेशोत्सवात दानपेटीत जमा होणारी संपूर्ण रक्कम पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्या येणार आहे.
एकीकडे चिंतामणीचे शतक महोत्सवी वर्ष तर दुसरीकडे राज्यात पूरस्थिती असल्याने या गणेश मंडळाकडून पुरग्रस्तांच्या मदतीसाठी ५  लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा करण्यात आले आहेत. 
गेल्या आठ दिवसांपासून सांगली, कोल्हापूर परिसरात महापूरानं थैमान घातलं आहे. लाखो लोकांना या महापुरामुळे विस्थापित व्हावं लागलं आहे. या महापुरामुळे करोडो रुपयांचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सव काळात चिंचपोकळी गणेश उत्सव मंडळात दानपेटीत जमा होणारी संपूर्ण रक्कम पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्यात येणार आहे. एकीकडे १०० वर्ष पूर्ण होण्याचा उत्साह जरी मंडळामध्ये असला तरी सामजिक बांधिलकीची जाण या हे मंडळ दाखवत असल्याने त्यांच्या या भूमिकेचं कौतुक केलं जात आहे.
  Print


News - Rajy | Posted : 2019-08-11


Related Photos