महत्वाच्या बातम्या

  पोलीस मदत केंद्र ताडगाव येथे भव्य जनजागरण मेळावा व नवीन प्रशासकिय इमारत उदघाटन सोहळा संपन्न


- नव्याने उभारण्यात आलेल्या पोलीस मदत केंद्र मनेराजाराम येथे दिली भेट 

- प्राणहिता उपमुख्यालयामध्ये घेतला सी-६० कमांडोचा दरबार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्हा हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिन जिल्हा असून येथील आदीवासी भागात राहणान्या नागरिकाचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने आज १० मार्च २०२३ रोजी पोलीस महासंचालक, म.रा. मुंबई रजनीश सेठ यांच्या उपस्थितीत गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोलीस दादाला खिड़कीचे माध्यमातून पोमके ताडगाव येथे जनजागरण मेळावा तोच त्यांच्या हस्ते पोमकें ताडगाव येथील नविन प्रशासकिय इमारतीचे उदघाटन सोहळा पार पडला. यावेळी जनजागरण मेळाव्यास उपविभाग भामरागड अंतर्गत पोमके ताडगाव हद्दीतील ५०० च्या संख्येने नागरीक उपस्थीत होते. उपस्थित आदिवासी नागरिकांना कार्यक्रमस्थळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध प्रकारच्या साहित्यांचे वाटप करण्यात आले असून, त्यात शिलाई मशीन, स्पे. पंप औषधी फवारणी, मच्छरदाणी भाजीपाला किट, बियाणे, फास्टफुड किट, प्लास्टीक बकेट, टिकाय, फावडे, ताडपत्री, सिंटेक्स, आदीवासी समाजासाठी स्वयंपाक साहीत्य (मोठे गंज झाकणीमह, स्टील बकेट, चमचे, चाटे, जग, भात वाढणी, स्टील पाट्या, स्टील ताट, भोजन चटई) तसेच शालेय विद्यार्थ्यासाठी फॉलीबॉल नेट, व्हॉलीबॉल, नोटबुक, कंपास, पेन्सील / खोडरबर, बॅट/बॉल, बॅटमिंटन, बॅटमिंटन शटल ऑक्स चॅटमिंटन नेट, स्टम्प्स सेट, बॉल पेन, स्कूल बैग व मंच चॉकलेट इत्यादी साहीत्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस महासंचालक, म.रा. मुंबई रजनीश सेट यांनी उपस्थित नागरीकांना संबोधीत करतांना सांगीतले की, पोलीस दलाचे कर्तव्य आहे की, गडचिरोलीतील नागरिकांपर्यंत पोहचून जास्तीत जास्त योजनांचा लाभ मिळवून द्यावा. त्यासाठी पोलीस नेहमी कटीबद्ध आहेत. दुर्गम भागात काम करणाया अधिकारी / अंमलदार यांनी आणखी उत्कृष्ट काम करावे, तसेच पोलीस आणि नागरिक यांनी एकजूट होऊन या भागाचा विकास केला पाहीजे. तसेच मा. पोलीस सहआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई शिरीष जैन यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगीतले की, मी जेव्हा गडचिरोली होतो, तेव्हा आणि आता विकासाच्या पावतीत खूपच फरक पडला आहे.

आज लोक आनंदित आहेत, त्यांच्यापर्यंत शासनाच्या सर्व योजना पोहचत आहेत, हे सर्व फक्त गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नांमुळे तसेच यावेळी उपस्थित पोलीस उप महानिरीक्षक संदिप पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगीतले की, आगामी काळात गडचिरोली जिल्हा देखील औद्योगीकदृष्ट्या प्रगत होईल, त्यासाठी तुमच्या मुला-मुलींना शिक्षण या पोलीस दर नेहमीच तुमच्या पाठीशी आहे. तसेच पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी आपल्या भाषणात पोमके ताडगाव हद्दीतील नागरीकांना पोलीस चालो खिडकीच्या माध्यमातून आवश्यक पर्यासकिय सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न करू तसेच गडचिरोली पोलीस दलाने नव्याने सुरु केलेल्या प्रोजेक्ट उडाण व प्रोजेक्ट उत्थान या उपक्रमाचा जास्तीत जास्त संख्येने नागरीकांनी सहभाग घेऊन त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले व गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने एक गाय एक वाचनालय या उपक्रमांतर्गत जिल्ह्याच्या ६० पोस्टे/उपपोस्ट/पार्क ठिकाणी नवीन वाचनालय उभे करणे आहे असे सांगीतले. पामके ताडगाव येथील झाल्यानंतर पोलीस महासंचालक म.रा. मुंबई रजनीश सेठ यानी नचिन उभारण्यात आलेले मन्नेराजाराम धिल पोलीस मदत केंद्राला भेट दिली. त्यावेळी पोसके परिसरातील ग्रामस्यांशी संवाद साधला व कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी व जचानाचे मनोबल यादवले तसेच त्यानंतर प्राणहिता येथील विशेष अभियान पथकातील चार दरवारमध्ये जांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना विरोधी अभियानाबाबत मार्गदर्शन केले. तसेच या २९ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस शौर्यपदक जाहीर झाले, त्यापैकी प्राणहिता येथे ०१ अधिकारी ०७ अंमलदार यांचा सत्कार करण्यात आला.

आजपर्यंत गडचिरोली पोलीस प्रशासनाकडून पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून सुरक्षा रक्षक ५१२, नर्सिग असिस्टंट ११९०, हॉस्पालिटी ३१४, ऑटोमोबाईल २०६ ईलेक्ट्रीशिअन १६७, प्लम्बग ३५, वेल्डींग ३८, जनरल अस्टिंट ३१४ फील्ड ऑफीसर ११ व व्हीएलई ५२ असे एकूण २०२६ गडचिरोली जिलातील युवक/युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच कृषी संज्ञान व व्यवस्थापन (आत्मा) सोनापुर, गडचिरोली व बीओआय आरसेटी गडचिरोली यांचे मार्फत व्युटीपार्लर १४०, मत्स्यपालन ८७, कुकुट पालन ५६६ बदल पालन २०० शेळीपालन ११५, शिणवला २४१, मधुमक्षिका पालन ५३, फोटोग्राफी ६५. भाजीपाला लागवड १३९५ पोलीसभरती पूर्व प्रशिक्षण १०६२. टू हिलर दुरुस्ती १९. फास्ट फूड ९६, पापड लोणचे ५९ कराटे प्रशिक्षण ४८, ड्रायव्हींग ५०२ असे एकुण १७८०पक युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमास मा. पोलीस महासंचालक रजनीश सेट पोलीस सह आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई शिरीष जैन पोलीस उप महानिरीक्षक संदिप पाटील पोलीस अधीक्षक नीलोत्पल अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक, अहेरी प्रतिश देशमुख,  उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड नितीन गणापूरे, असिस्टेंट कमाण्डेंट, सिआरपीएफ कमलेश इंदोरा, तसेच सिताराम मडावी, आधुनिक शेतकरी, लालसू आत्राम, माजी सभापती, पं.स. भामरागड, श्रीमती कविता इतमवार, नगरसेविका, नगरपंचायत भामरागड प श्रीमती तेजस्विनी मडावी, नगरसेविका भामरागड हे उपस्थित होते.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड नितीन गणापूरे, पोलीस मदत केंद्र ताडगावचे प्रभारी अधिकारी प्रेमशा सयाम व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos