मुसळधार पावसामुळे कन्नमवार जलाशय झाले ‘ओव्हरफ्लो’


- पर्यटकांची गर्दी वाढणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
मुसळधार सुरू असलेल्या पावसामुळे चामोर्शी तालुक्यातील कन्नमवार जलाशय १०० टक्के भरले असून ओव्हरफ्लो झाले आहे. जलाशयाच्या सांडव्यातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असून या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढणार आहे.
जिल्ह्यात एकमेव असलेल्या रेगडी येथील कन्नमवार जलाशयामुळे शेकडो हेक्टर शेतीला सिंचनाची सुविधा मिळते. हे जलाशय दिना नदीवर निर्माण करण्यात आले आहे. हे जलाशय आता पूर्णपणे भरल्यामुळे सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे नयनरम्य दृश्य नजरेस पडत आहे. निसर्गरम्य वातावरणात वाहणार्या पाण्याचे दृश्य पाहण्यासाठी या ठिकाणी आता पर्यटक गर्दी करणार आहेत. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-20


Related Photos