शिवजन्मोत्सव समिती अहेरी तर्फे शिवजयंती शोभायात्रा
- माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा श्रीमंत राजे अंब्रिशराव आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : अहेरी येथील शिवजन्मोत्सव समिती तर्फे दर वर्षी प्रमाणे यंदाही शिवाजी महाराज जयंती वृंदावन धाम मध्ये मोठ्या उत्सवाने साजरा करण्यात आले. दर वर्षी प्रमाणे समितीने या वेळी वृंदावन धाम येथे शिवाजी महाराज पुतळ्याची विधिवत पूजन करण्यात आले.
अहेरी शहरात सायंकाळी ६ वाजता शोभा यात्रा सुरुवात करण्यात आले. या शोभा यात्रेत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आकर्षक सजावट करण्यात आले. शोभा यात्रेला प्रसिद्ध बाबुळगाव बँड, सजावटी घोडा, विविध वेशभूषा झाखी हे सर्वांचे लक्ष वेधले. आणि डीजे च्या तालावर तरुण तरुणी आणि सर्व शिवभक्त नाचत गाजत शहरातील प्रमुख मार्गातून शोभा यात्रा काढण्यात आले. शिवजन्मोत्सव समिती च्या आव्हाहनाने शहरातील १४० बालकांनी छत्रपती शिवाजी- जिजाऊ वेशभूषेत सहभागी झाले.
माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा श्रीमंत राजे अंब्रिशराव आत्राम यांनी योभा यात्रेत उपस्थित राहून सर्व शिवभक्तांच्या उत्साह वाढविले.
यावेळी राजे अंब्रिशराव महाराज म्हणाले की, ज्या उत्साहाने शिव जयंती साजरा करतो. त्याच प्रमाणे शिवाजी महाराज काय होते, काय संघर्ष केला, कसा स्वराज्य स्थापन केली, सर्व धर्माला कसा न्याय द्यायचे अशा प्रसंग आणि गोष्टी आहेत ते वाचून काढा आणि त्यांचे प्रेरणा घेऊन सामाजिक कार्यकर्ते बना.
या कार्यक्रमाला शिवजन्मोत्सव समिती चे पदाधिकारी व शिव भक्त कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्रासह भारतभर साजरी केली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार, फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (१९ फेब्रुवारी १६३०) रोजी शिवरायांचा जन्म झाला होता. महाराष्ट्रातील प्रत्येक शिवभक्तासाठी हा दिवस एखाद्या उत्सवाप्रमाणे असतो. गेल्या काही वर्षांमध्ये शिवजयंती मोठ्या जल्लोषामध्ये साजरी केली जात आहे. १८६९ मध्ये महात्मा फुले यांनी रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि त्यानंतर १८७० मध्ये पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली गेली. आणि आजही ही शिवजयंती जयंती उत्साहात साजरी केली जाते.
News - Gadchiroli