महत्वाच्या बातम्या

  ग्रामपंचायतीच्या पोट निवडणूक क्षेत्रात ३ दिवस दारु विक्री बंद


- नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुका


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : नागपूर जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील 53 ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुका 18 मे रोजी होणार आहेत तर मतमोजणी 19 मे ला होणार आहे. पोट निवडणूक कालावधीत म्हणजेच 17 मे, 18 मे व 19 मे या तीनही दिवशी या ग्रामपंचायती क्षेत्रात दारु विक्री बंद  ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जारी केले आहे. 19 मे रोजी ज्या तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी  होणार आहे. त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रामधील सर्व अनुज्ञप्ती बंद राहतील, असेही आदेशात नमूद आहे.  


तालुक्यानिहाय पोट निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायत या प्रमाणे आहेत. काटोल-6, नरखेड-7, सावनेर-3, कळमेश्वर-4, रामटेक-3, पारशिवणी-2, मौदा-4, रामटेक-3, कामठी-2, उमेरड-2, भिवापूर-9, कुही-6, नागपूर ग्रामीण- 2, हिंगणा-3  अशा 53 ग्रामपंचायत पोट निवडणूक क्षेत्रात सर्व अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेशात नमूद करण्यात आले असून या आदेशाचा भंग करणाऱ्या संबंधीत अनुज्ञप्तीधारकाविरुध्द नियमानूसार सक्तीची कार्यवाही करण्यात येणार आहे.  





  Print






News - Nagpur




Related Photos