देशातील बँकांमध्ये ३५ हजार कोटी रुपये बेवारस : सार्वजनिक बँकांनी आरबीआयकडे सोपवली रक्कम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : देशातील सार्वजनिक बँकांमध्ये तब्बल 35 हजार कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. सदरच्या रकमेला कोणी वालीच नसून ती रक्कम बँकांनी आरबीआयला सुपूर्द केली आहे. सर्वसामान्य नागरिक आपल्या कष्टाची जमापुंजी सुरक्षित रहावी म्हणून बँकेत ठेवतात. तर काहीजण एकापेक्षा जास्त बँकांची खाती काढतात. मात्र, कालांतराने या बँक खात्याकडे खातेदाराचे दुर्लक्ष होते. तसेच अनेक खातेदारही बँकेत खाते काढताना आपल्या वारसाची नोंद करत नाहीत. त्यामुळे अशा खात्यांवर तब्बल 35 हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.
त्याशिवाय अशी देखील काही बँक खाती आहेत त्या खात्यांवर कोणत्याही वारसांची नोंद नाही. त्या खात्यातील सर्व रक्कम बँकांनी रिझर्व्ह बँकेकडे सोपवली आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी लोकसभेत लिखित उत्तरात माहिती दिली. सर्वाधिक बेवारस 8 हजार 86 कोटी रुपयांची रक्कम एसबीआय मध्ये होती, तर पंजाब नॅशनल बँकेत 5340 कोटी रुपये, कॅनरा बँकेजवळ 4558 कोटी रुपये जमा होते.
News - Rajy