महत्वाच्या बातम्या

 क्षयरुग्ण शोध मोहिम कार्यक्रम ८ ते २१ मार्च पर्यंत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर :
क्षयरोगाबाबत जनसामान्यामध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागा मार्फत जागतिक क्षयरोग दिन मोहिम अंतर्गत प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिम कार्यक्रम 8 ते 21 मार्च 2023 या कालावधीत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील जोखिमच्या क्षेत्राकरिता तयार केलेल्या कृती आराखडयाद्वारे आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, क्षेत्रीय स्तरावरील आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक यांचे पथकाद्वारे दररोज 30 ते 40 घरांना गृहभेट देऊन क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना शोधणे, त्यांची थुंकी नमुने तपासणी, एक्स-रे तपासणी, आवश्यकते नुसार नॅट तपासणी व इतर तपासणी करून क्षयरोगाचे निदान करणे व औषधोपचार त्वरीत चालू करणे.

ही मोहिम राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमातंर्गत जिल्हयातील सर्व तालुका अतंर्गत (तालुका क्षयरोग पथक) अतिजोखिम ग्रस्त लोकसंख्येत (उदा. झोपडपट्टी, विटभट्टी, भटक्या जमाती, कामासाठी स्थलांतरित तसेच खाणीमध्ये काम करणारे कामगार, बेघर इ. सामाजिक गट तसेच तुरुंग, वृद्धाश्रम, आश्रम शाळा व वस्तीगृह, आदिवासी मुलांचे वस्तीगृह, मनोरुग्णालय, इ.) ही मोहीम करण्याचे ठरविले आहे. लोकसंख्या ही एकूण निवडलेली लोकसंख्या ( Presumtive cases) 219352 या मध्ये एकुण क्षयरुग्ण संशयीत 4387 होण अपेक्षीत आहे. तसेच यातून एकुण 222 क्षयरुग्ण (TB Cases) शोधणे उद्देश आहे.

सदर मोहिम प्रभावीपणे राबविण्याकरिता सामान्य जनतेने क्षयरोगाबाबत तपासणी करून घ्यावी आणि त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. विपिन इटनकर जिल्हाधिकारी नागपूर यांनी जिल्हा टिबी फोरम सभेमध्ये केलेले आहे. या दरम्यान राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत सर्व आरोग्यवर्धिनी केंद्रात 14 मार्च रोजी आरोग्य मेळावा, नि-क्षय दिवस साजरा करणे, प्रधानमंत्री टिबी मुक्त भारत अभियान अंतर्गत निक्षय मित्र बनविण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणे, नोंदणीकृत नि-क्षय मित्र यांचे मार्फत क्षयरुग्णांना फुड बास्कटचे वाटप करणे, क्षयरुग्णांचे घरातील सदस्यांची तपासणी करून त्यांना IPT चालू करणे, उपचार खाली असलेल्या क्षयरुग्णांचे Adherence साठी समुपेशन करणे, क्षयरोगाच्या लक्षणांबाबत समाजामध्ये जनजागृती करणे, इत्यादी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos