महत्वाच्या बातम्या

 गरीब मुलींचा लग्नासाठी गुजरातमध्ये सौदा : एक ते दोन लाखात विक्री


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : महाराष्ट्रातील गरीब व अल्पवयीन मुलींचा राजस्थान व गुजरातमध्ये लग्नासाठी काही लाख रुपयांमध्ये सौदा होत असल्याची धक्कादायक माहिती विधान परिषदेतील लेखी उत्तरातून पुढे आली आहे. यासंदर्भात या वर्षी त्यासंदर्भात २४ गुन्हे नोंद झाले आहेत, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिले.

रासप आमदार महादेव जानकर यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला लेखी उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. २०२१ मध्ये महिलांचे विवाहासाठी अपहरण केल्याप्रकरणी ४०५ गुन्हे नोंद होते. विवाहासाठी ४१८ महिलांचे अपहरण झाले होते. त्यामध्ये ३६३ अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. तर या गुन्ह्यांमध्ये ४४८ आरोपींना अटक झाले होते.

२०२३ मध्ये राज्यात विवाहासाठी अपहरण करण्यात आल्याप्रकरणी २४ गुन्हे नोंद केले आहेत. राज्यातून गरिब व अल्पवयीन मुलींची राजस्थान व गुजरात राज्याच्या काही गावांमध्ये विवाहासाठी एक ते दोन लाख रुपयांमध्ये सौदा केला जातो, हे अंशतः खरे असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

२३३ अल्पवयीन मुली बेपत्ता

मुंबईतून २०२२ मध्ये १ हजार ३३० अल्पवयीन मुली बेपत्ता होत्या, पैकी १ हजार ९७ मुली सापडल्या आहेत. १८ वर्षावरच्या ४ हजार ४३७ महिला हरवल्याची नोंद वर्ष २०२२ मध्ये झाली होती. पैकी ३ हजार ३९ महिला सापडल्या आहेत, असे गृहमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. हरवलेली मुले, मुली शोधण्यासाठी ऑपरेशन मुस्कान आणि ऑपरेशन रियुनाइट राबवण्यात येत आहे. 





  Print






News - Rajy




Related Photos