भंडारा येथे १३ ऑगस्ट ला युवा दिनाचे आयोजन : १२ ते २६ ऑगस्ट पर्यंत सप्ताह


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा :
  महाराष्ट्र एडस सोयायटी मुंबई अंतर्गत जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा द्वारे आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयीन युवक- युवतीकरीता रॅली , रांगोळी कालाज, पोस्टर, सेल्फी/सोशल मिडिया स्पर्धा १३ ऑगस्ट २०१९ रोजी ९. ४५ वाजता सामान्य रुग्‍णालय भंडारा व सकाळी जे.एम. पटेल महाविद्यालय भंडारा येथे आयोजित करण्यात येणार आहे. या वर्षीचे युवा दिनाचे घोष वाक्य ट्रान्सफारमिंग एज्युकेशन असे आहे.
रॅलीची सुरुवात हिरवी झेंडी दाखवून जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी करतील. रॅली सामान्य रुगणालय-मोठा बाजार-मुस्लिम लायब्ररी चौक येथून जे.एम.पटेल येथे सांगता होईल. यावेळी एचआयव्ही/एडस या विषयावर मार्गदर्शन, युवा दिनाचे महत्व, विविध स्पर्धेचे अयोजन, आईसी वाटप इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
१२ ते २६ ऑगस्ट २०१९  या कालावधीमध्ये तालुकास्तरावर संबंधित आयसीटीसी समुपदेशक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांचेद्वारे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन युवक-युवतीकरीता एचआयव्ही/एडस विषयावर मार्गदर्शन, रक्तदान शिबीर व आयईसी वाटप करण्यात येईल . महाविद्यालयीन युवक-युवतींनी स्पर्धेत सहभाग नोंदवून एचआयव्ही/एडस कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  Print


News - Bhandara | Posted : 2019-08-11


Related Photos