महत्वाच्या बातम्या

 देसाईगंज तालुक्यातील सावंगी व गांधीनगर ग्रामपंचायत निवडणुकित भाजप पॅनलचा विजय 


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : तालुक्यातील सावंगी व गांधीनगर ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. यात सावंगी व गांधीनगर ग्रामपंचायतवर भाजपा समर्थित उमेदवार निवडून आले. थेट जनतेतून सरपंच निवडून देण्याची ही पहिलीच निवडणूक आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या सरपंच व सदस्यपदाच्या निवडणुकीच्या निकालात सावंगी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रभा मनोज ढोरे तर नव्याने स्थापन झालेल्या गांधीनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सपना देवदत्त धाकडे यांची वर्णी लागली. या ग्रामपंचायतीमध्ये पहिली महिला सरपंच म्हणून गांधीनगरच्या सपना धाकडे यांना मान मिळाला. सावंगी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रभा ढोरे तर सदस्य म्हणून मीरा पेलने, तौसिफ कुरेशी, देवानंद बन्सोड, शालिनी मेश्राम, रजनिकांत गुरनुले, नैना सहारे, सुमंत मेश्राम, सुषमा प्रधान, स्नेहा गुरुनले यांचा समावेश आहे. गांधीनगर ग्रामपंचायतमध्ये सरपंच सपना धाकडे तर ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून करिष्मा सुंदरकर, चक्रधर बनकर, शालू ढवळे, रामचंद्र नखाते, अलका मोहुर्ले, वैभव मेश्राम, वर्षा चंडिकार, नेताजी सुंदरकर, वैष्णवी दुधाळकर हे निवडून आले. ५ नोव्हेंबर २०१९ रोजी सावंगी ग्रामपंचायतमधून गांधीनगरला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे गांधीनगरच्या ग्रामपंचायतीसाठी १६ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया घेण्यात आली. गांधीनगर ग्रामपंचायतीची पहिलीच थेट निवडणूक असल्याने या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी मोठी चुरस झाली. सावंगी ग्रामपंचायतमध्ये २४९८ पैकी १६२१ मतदारांनी व गांधीनगर ग्रामपंचायतमध्ये १७४० पैकी ११५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सावंगी ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदासाठी सर्वसाधारण (स्त्री राखीव) प्रभा ढोरे, संगीता तुपटे, शालिनी पारधी या रिंगणात होत्या. यात प्रभा ढोरे या १५६ मतांनी विजयी झाल्या. तर ९ सदस्यसंख्या असलेल्या सावंगी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी १९ उमेदवार उभे होते. तर गांधीनगर ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदासाठी अनुसूचित जाती (स्त्री राखीव) होती. यात प्रमिला चहांदे, सपना धाकडे, अरविंदा नंदागवळी या रिंगणात होते. यात सपना धाकडे या ३२५ मतांनी विजयी झाल्या. गांधीनगर ग्रामपंचायत ९ सदस्यसंख्या असून सदस्यपदासाठी १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. देसाईगंज तालुक्यातील सावंगी व गांधीनगर ग्रामपंचायतीवर भाजपा समर्थित पॅनलने विजयाचा झेंडा फडकविला.

Facebook    Twitter      
  Print


News - Gadchiroli | Posted : 2022-10-21
Related Photos