महत्वाच्या बातम्या

 आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात : खासदार रामदास तडस यांनी केली पाहणी


- आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलाचे रेल्वे ब्लॉक करिता स्ट्रक्चरल ऑडिट

- पुढील आठवडयात रेल्वे ब्लॉक मिळाल्यानंतर रेल्वेवरील काम सुरु होणार.

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : बजाज चौक येथील आर्वी-वर्धा वायगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २६७ वरील आचार्य विनोबा भावे पुलावर अस्तीत्वास असलेल्या रेल्वे मार्गावर उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाचे कार्य अंतिम टप्प्यात असुन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कार्य सुरु आहे. सदर बजाज चौक येथील उड्डाण पुलाचे रेल्वे ब्लॉक करिता स्ट्रक्चरल ऑडिट दोन दिवसात पुर्ण होणार असुन पुढील आठवडयात रेल्वे ब्लॉक मिळाल्यानंतर रेल्वेवरील काम सुरु होणार, असे उपस्थित अधिकारीवर्गानी खासदार रामदास तडस यांना सांगीतले

आज वर्धा येथे आर्वी वर्धा वायगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २६७ वरील आचार्य विनोबा भावे पुलावर अस्तीत्वास असलेल्या रेल्वे मार्गावर उड्डाणपुल रुंदीकरण कार्याचा प्रत्यक्ष आढावा घेण्याकरिता व तांत्रीक बाजु समजुन घेण्याकरिता खासदार रामदास तडस यांनी उड्डाणपुलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी कार्यकारी अभियंता सतीश अंबोरे, सहाय्यक मंडल अभियंता रजनीश कुमार  राजन, एसएसई योगेश तुरकर, एसएसई वर्क अरुण भोले, राजेंद्र आचार्य, नतीन नलगीरे उपस्थित होते.

यावेळी वर्धा येथील आचार्य विनोबा भावे उड्डाणपूल जे काम अंतिम टप्प्यात असून आज मेगा ब्लॉक घेण्यासाठी रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व्दारा स्ट्रक्चरल ऑडिट सुरु असुन व ते काम येत्या दोन दिवसात पुर्ण होणार आहे, पुढील आठवड्यामध्ये मेगा ब्लॉक घेऊन तयार केलेला पूल जोडण्यात येईल व जानेवारीमध्ये संपूर्ण पुलाचे काम पूर्ण होईल असे अधिकारऱ्यांनी खासदार रामदास तडस यांना हमी दिले.

वर्धा शहरातील अस्तीत्वात असलेला आचार्य विनोबा भावे पुल अरुंद असल्यामुळे वर्धा शहरातील व परीसरातील नागरिकांना वाहतुकीचा त्रास मोठया प्रमाणात होत आहे. तसेच अनेकवेळा वाहतुकीची कोंडी होते व नागरिकांना त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे पुलांच्या रुंदीकरनाचे कार्य तातडीने होणे गरजेचे आहे. काम पुर्ण व्हावे. यासाठी लोकसभेत प्रश्न उपस्थित करुन, रेल्वे विभाग, अधिकाऱ्यांच्या बैठका, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न केला, आज गडरच्या स्टक्चरचे ऑडीट सुरु असुन दोन दिवसात पुर्ण होईल, पुढील आठवडयात मेगा ब्लॉक मिळणार असुन जानेवारी पंर्यत काम पुर्ण करण्याच्या सुचना अधिकारी वर्गाला दिलेल्या आहे, लवकरच पुलाचे काम पुर्ण हाईल व वाहतुक सुरु होईल, असा विश्वास यावेळी खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केला.





  Print






News - Wardha




Related Photos